शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

आॅईल प्लॉन्टला नागरिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 21:38 IST

तालुक्यातील ग्राम पाऊलदौना ग्रामपंचायतच्या हद्दीत पांढरी गावाजवळ एका शेतात आॅईल प्लांट सुरु करण्यासाठी बांधकाम सुरु झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी प्रदूषणाची भिती व्यक्त करीत या आईल प्लांट स्थापित करण्याला विरोध केला आहे.

ठळक मुद्देवायु प्रदूषण वाढण्याची भीती : नाहरकत प्रमाणपत्र न घेता बांधकाम सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील ग्राम पाऊलदौना ग्रामपंचायतच्या हद्दीत पांढरी गावाजवळ एका शेतात आॅईल प्लांट सुरु करण्यासाठी बांधकाम सुरु झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी प्रदूषणाची भिती व्यक्त करीत या आईल प्लांट स्थापित करण्याला विरोध केला आहे.मागील काही दिवसांपासून पांढरी गावाजवळ बांधकाम सुरु असता या परिसरातील नागरिकांना हे माहितीच नाही की कशाचे बांधकाम सुरु आहे. जेव्हा गावातील काही सुज्ञ लोकांनी इंटरनेटवर माहिती काढली तेव्हा असे लक्षात आले की, छत्तीसगड राज्यातील एका मोठ्या उद्योगपतीच्या माध्यमातून येथे गजानन पॅरा प्रॉडक्ट पॅरालिसेस प्लांट या नावाने आॅईल प्लांट सुरु करण्यासाठी सदर बांधकाम केले जात आहे.तेव्हा गावातील नागरिक हडबडून जागे झाले व त्यांनी ग्रामपंचायतशी संपर्क साधला असता ग्रामपंचायत मधून कोणतेही नाहरकत प्रमाणपत्र घेतले नाही असे कळले. तसचे तालुका स्तरावर महसूल विभागाची सुद्धा कोणतिही परवानगी घेतली नाही. आॅईल प्लांट पांढरी गावाजवळ सुरु झाल्यास या परिसरातील जवळपास २० किमी क्षेत्रापर्यंत वायू प्रदूषणाचा फटका बसेल. हे वायू प्रदूषण मनुष्यांनाच नाही तर पशू आणि शेतीला सुद्धा घातक ठरणार आहे. या प्लांटमध्ये सुमारे ५०० सेटींग्रेट पर्यंत टायर जाळून आॅईल तयार केले जाईल. टायर जाळताना येथून विषारी गॅस उत्सर्जित होणार असल्याचे काही जानकार लोक सांगत आहे.त्यामुळे परिसरातील लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम पडणार आहे. या प्लांटमुळे या परिसरातील पांढरी, पाऊलदौना, सोनपुरी, पाथरी, खेडेपार, रामाटोला इत्यादी गावांना प्रदूषणाच्या जबरदस्त फटका बसणार असल्याची शंका वर्तविली जात आहे. त्यामुळे या गावातील लोकांमध्ये दहशत पसरलेली आहे.या बाबी लक्षात घेत या ग्रामपंचायतींनी प्लांटला विरोध करण्याचा ठराव घेतला. तसेच गावकऱ्यांनी तहसीलदार प्रशांत सांगळे, ठाणेदार राजकुमार डुणगे व इतर संबंधीत अधिकाºयांची भेट घेऊन आपली चिंता व्यक्त केली आहे. सदर प्लांट गावाजवळ स्थापित न करता गावापासून आवश्यक त्या अंतरापर्यत दूरवर स्थापित करण्यात यावे, अशी मागणी सुध्दा गावकऱ्यांनी केली आहे.या प्लांटबाबत पर्यावरण नियंत्रक मंडळाची सुद्धा परवानगी घेण्यात आली की नाही. याबाबत कोणालाच माहिती नाही. ग्रामपंचायतकडे नाहरकत प्रमाणपत्रासाठी आवेदन केल्याचे बोलले जात आहे. परंतु याबद्दल गावकऱ्यांना खरी माहिती दिली जात नाही, असे बोलले जात आहे. यापुढे प्रशासन कोणते पाऊल उचलते हे बघावे लागेल.महिला बचतगटाने केला विरोधया परिसरातील बचतगटांच्याही महिला प्लांटला विरोध करण्यासाठी सरसावल्या असून जर हे प्रदूषण वाढविणारे प्लांट सुरु झाले तर आंदोलन उभारुन निषेध केला जाईल, अशा इशारा दिला आहे.ज्या ठिकाणी प्लांट लावण्याचे बोलले जात आहे. तिथे सध्या भिंतीचे काम सुरु असून या ठिकाणी नेकमे कशाचे बांधकाम होणार आहे. याबाबत लेखी पुरावे प्राप्त झाले नाही. तरी सुद्धा महसूल विभाग यावर नजर ठेवून आहे. विना परवानगी कोणतेही बांधकाम केले जाऊ देणार नाही.प्रशांत सांगळे, तहसीलदार, सालेकसा.ग्रामपंचायतला नाहरकत प्रमाणपत्रासाठी आवेदन मिळाले आहे. परंतु आतापर्यंत प्लांटबद्दल पूर्ण माहिती स्पष्ट झाली नसून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले नाही.ढोमणे, ग्रामसेवक,ग्रा.पं.पाऊलदौना.