गोंदिया : गत पंधरवड्यापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे सर्दी, खोकला यासारखे आजार बळावले आहे. दिवसा ऊन, कधी पाऊस व रात्रीची थंडी या प्रतिकूल वातावरणामुळे हा प्रकार होत आहे. घरोघरी सर्दी व तापाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. वातावरणात सतत बदल होत असताना प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला या वातावरणात जुळवून घेणे सहज शक्य होत नाही़ लहान बालके, वृद्ध व ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशा व्यक्तींना आजाराची लवकर लागण होते. सायंकाळनंतर खूप थंडी व सकाळनंतर असह्य उकाडा अशा वातावरणातमुळे साथीचे आजार बळावत आहे. वातावरणातील अचानक बदलामुळे विषाणूजन्य आजारातदेखील मोठा प्रमाणात वाढ झाली आहे़ आधीच श्वसनाचे विकार असणाऱ्या व्यक्तींना या वातावरणाचा अती त्रास होत आहे़ गावागावातील प्राथमिक स्वास्थ केंद्र, खासगी रूणालये रूग्णांच्या संख्येमुळे खच्चून भरले आहेत़ आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्वाचे झाले आहे़
सर्दी, खोकला या आजाराने नागरिक बेजार
By admin | Updated: November 3, 2014 23:28 IST