शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

चुलोद रस्ता ठिकठिकाणी उखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:26 IST

हड्डीटोली चौकीवर पूल बांधकाम सुरू करा गोंदिया : शहरातील हड्डीटोली येथील रेल्वे चौकीवर रेल्वे गाड्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असल्याने ...

हड्डीटोली चौकीवर पूल बांधकाम सुरू करा

गोंदिया : शहरातील हड्डीटोली येथील रेल्वे चौकीवर रेल्वे गाड्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असल्याने नागरिकांनी चौकावर ताटकळत उभे राहावे लागते. येथे उड्डाणपूल तयार झाल्यास नागरिकांचा वेळ वाया जाणार नाही. आता पुलाला मंजुरी आली आहे. मात्र, लवकर काम करण्याची मागणी आहे.

कॉलनीत नाली बांधकामाची मागणी

गोंदिया : शहरातील विवेकानंद कॉलनीत नाल्यांचे बांधकाम नसल्याने कित्येकांच्या घरासमोर पावसाचे पाणी साचून राहते. अशात कित्येकदा चिखलात घसरून नागरिक घसरून पडले आहेत. नगर परिषदेने घरासमोर नाली बांधकाम केल्यास पावसाचे पाणी त्यातून निघून जाणार. त्यासाठी नाली बांधकामाची मागणी केली जात आहे.

उखडलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी

गोंदिया : मामा चौक ते डॉ. गुजर यांच्या घरापर्यंतचा रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला आहे. या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे, पण त्यानंतर रद्द करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. मात्र, रस्ता उखडला असल्याने नागरिकांची चांगलीच फजिती होत आहे. रस्ता बांधकामाची मागणी केली जात आहे.

सिव्हिल लाइन्स परिसर अंधारात

गोंदिया : शहरातील सिव्हिल लाइन्स परिसरातील माता मंदिर चौक ते पुढे मामा चौकापर्यंत पथदिवे रात्रीला बंद असतात. यामुळे हा परिसर रात्रीला अंधारात असतो. या परिसरातील रस्ते अगोदरच उखडलेले आहेत. त्यात अंधार असल्याने नागरिकांनी ये-जा करताना त्रास होतो. नगर परिषदेने लक्ष देऊन पथदिवे सुरू करण्याची गरज आहे.

ब्रेकर ठरत आहेत धोकादायक

गोंदिया : शहरात आजघडीला मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर ब्रेकर तयार करण्यात आले आहेत. या ब्रेकरमुळे नागरिकांना वाहनांची गती कमी लागते हे खरे. मात्र, ब्रेकरच्या झटक्यांमुळे कित्येकदा अपघातही घडत आहेत. कित्येकदा दुचाकीवर मागे बसलेली व्यक्ती खाली पडल्याचे प्रकार घडले आहेत. अव्यवस्थितरीत्या तयार करण्यात आलेले ब्रेकर काढण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

नवेगावबांध : वन्य हिंस्त्र प्राण्यांनी शेतशिवार व गाव परिसरात शिरकाव करून मनुष्य व पाळीव प्राण्यांवर हल्ला करून जखमी करणे किंवा त्या प्राण्यांना ठार करणे सुरू केले आहे. हिंस्त्र प्राण्यांच्या धुमाकुळामुळे जंगलप्रवण व त्यास लागून असलेल्या भागात अधिवास करणारे नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत. वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे

गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) ग्रामीण भागामध्ये १ लाख किलोमीटर लांबीचे पादंण रस्ते व इतर खडीकरण रस्ते निर्मितीचा संकल्प करण्यात आला आहे.

जंगलातील वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू

साखरीटोला : वनसंपदेने नटलेल्या जिल्ह्यातील वनांमध्ये वनतस्कर व शिकाऱ्यांची वहिवाट दिसून येते. तस्करांनी वनविभागाचे दुर्लक्ष साधून वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू केल्याचे दिसत आहे.

विश्रामगृह तयार करण्याची मागणी

केशोरी : जिल्ह्यास्थळावरून या भागाची पाहणी करण्यासाठी किंवा शासकीय कामासाठी येणारे वरिष्ठ अधिकारी आमदार, खासदार येथे येतात. त्यांना थांबण्यासाठी येथे विश्रामगृहाची आवश्यकता आहे.