शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

करंट लावून चितळाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 00:56 IST

आमगाव तालुक्याच्या पाऊलदौना येथे चितळ जातीच्या हरिणाची शिकार करून फुक्कीमेटा येथील

फुक्कीमेटातील कारवाई : एकाला अटक, तीन फरार गोंदिया : आमगाव तालुक्याच्या पाऊलदौना येथे चितळ जातीच्या हरिणाची शिकार करून फुक्कीमेटा येथील आरोपीच्या घरी त्या चितळाचे चामडे काढताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. चार आरोपींपैकी एकाला अटक केली तर तीन जण फरार झाले आहेत. ही कारवाई सोमवारच्या पहाटे ५ वाजता करण्यात आली. आमगाव तालुक्याच्या फुक्कीमेटा येथील आरोपी हिवराज उर्फ मधु लक्ष्मण सापके (४५) याने गावातील शत्रुघ्न सोनवाने व इतर दोन अशा चौघांनी पाऊलदौना जंगलात करंट लावून रविवारच्या रात्री एका चितळाची शिकार केली. शिकार केलेले चितळ पाऊलदौना येथे आणून आरोपी हिवराजच्या घरी रात्री त्या चितळाचे चामडे काढणे सुरु होते. हिवराजच्या घरामागील वाडीत बांबुच्या असलेल्या झाडाला हे चितळाचे शरीर टांगून चामडे काढणे सुरू होते. याची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी वेळीच घटनास्थळ गाठले. परंतु वनाधिकाऱ्यांना पाहून तीन आरोपी फरार झाले तर हिवराजला अटक करण्यात वनाधिकाऱ्यांना यश आले. हिवराज यापूर्वीही फासे घेऊन वनाधिकाऱ्यांना मिळाला होता. परंतु त्याच्याकडे मुद्देमाल न मिळाल्याने त्याला समज देऊन सोडण्यात आले होते. परंतु सराईत असलेल्या या आरोपीने शेवटी करंट लावून चितळाची शिकार केली. सदर कारवाई उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, सहायक वनसंरक्षक यु.टी.बिसेन यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्राधिकारी डी.बी.पवार, सहायक वनक्षेत्राधिकारी एल.एस.भुते, क्षेत्र सहायक आर.जे. भांडारकर, वनरक्षक ओ.एस.बनोठे, एस.के.येरणे, आर.बी.भांडारकर, वनमजूर ओ.जी.रहांगडाले, कुवरलाल तुरकर, विश्वनाथ मेहर, राजु बावणकर यांनी केली. आरोपीविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २/१६, २/३६, ९, ३९, ९१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला दोन दिवसाची वनकोठडी मिळाली आहे. (तालुका प्रतिनिधी) शिकारीतील आरोपीने युवकाला ब्लेडने मारले शिकार केल्यानंतर होळी जवळ जाऊन आरोपी हिवराज सापके हा शिवीगाळ करीत होता. त्याला शिवीगाळ करू नकोस असे गावातीलच दुधराम योगराज बिसेन (२६) या तरुणाने म्हटले असता त्याच्याशी वाद घालून दुधरामला ब्लेडने मारून जखमी केले. ही घटना रविवारच्या रात्री ११ वाजता घडली. हिवराज लक्ष्मण सापके (५०) रा. फुक्कीमेटा याच्याविरूध्द आमगाव पोलीस ठाण्यांत भादंविच्या कलम ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यासाठी आमगाव पोलीस गेले होते, मात्र त्यापूर्वी वनाधिकाऱ्यांनी त्याला अटक केली होती.