शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चपराशाने अधिकाऱ्यांचे आदेश झुगारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:12 IST

नगर परिषद पाणी पुरवठा सभापती व नगरसेवकांच्या वादाचे प्रकरण अधिकच चिघळले असून सभापतींनी त्या नगरसेवकाच्या प्रभागात टँकर पाठवू नका असे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर पाणी पुरवठा विभागातील चपराश्याने चक्क प्रशासनीक अधिकाऱ्यांचा आदेश झुगारले.

ठळक मुद्दे‘त्या’ प्रभागात टँकर पाठवू नका : सभापतींचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषद पाणी पुरवठा सभापती व नगरसेवकांच्या वादाचे प्रकरण अधिकच चिघळले असून सभापतींनी त्या नगरसेवकाच्या प्रभागात टँकर पाठवू नका असे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर पाणी पुरवठा विभागातील चपराश्याने चक्क प्रशासनीक अधिकाऱ्यांचा आदेश झुगारले. यामुळे कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक चांगलेच संतापले आहे.पाण्याच्या टँकरला घेऊन प्रभाग क्रमांक २१ चे नगरसेवक भागवत मेश्राम व नगर परिषद पाणी पुरवठा समिती सभापती दीपक बोबडे यांच्यात बुधवारी (दि.९) मोबाईलवरच शाब्दीक बाचाबाची झाली होती. यावर नगरसेवकांनी हे प्रकरण फेसबूकवर टाकले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि.११) नगरसेवक मेश्राम यांनी पाणी पुरवठा विभागात फोनकरून टँकरची मागणी केली. मात्र पाणी पुरवठा विभागातील चपराशी बंसोड याने तुमच्या प्रभागात टँकर पाठवायचा नाही असे आदेश दिल्याचे सांगीतले. यावर मेश्राम यांनी कॉँग्रेस पक्षातील सर्व नगरसेवकांना माहिती दिली व त्यांनी प्रशासनीक अधिकारी सी.ए.राणे यांना सांगीतले. राणे यांनी बंसोड याला फोनकरून टँकर पाठविण्यास सांगीतले असता बंसोड याने त्यांचाही आदेश झुघारला. दरम्यान, माजी नगरसेवक राकेश ठाकूर, नगरसेवक सुनील भालेराव, सुनील तिवारी, क्रांती जायस्वाल, भागवत मेश्राम, देवा रूसे आदिंनी बांधकाम समिती सभापती शकील मंसूरी यांच्या उपस्थितीत त्यांच्या दालनात मुख्याधिकारी चंदन पाटील व प्रशासनीक अधिकारी राणे यांना बोलाविले. येथे सर्वांनी सभापती बोबडे यांच्या या कृत्याचा निषेध व्यक्त केला. सर्वांनी राजकारण ही वेगळी बाब असून कुणाच्या प्रभागात पाणी न पाठविणे हे उचीत नसून या प्रकारावर तोडगा काढण्यास सांगीतले. विशेष म्हणजे, सभापती बोबडे यांच्या या कृत्यामुळे कॉँग्रेस पक्षातील नगरसेवक चांगलेच खवळले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बंसोड याचे तडकाफडकी स्थानांतरणसभापती मंसूरी यांच्या दालनात प्रशासनीक अधिकारी राणे यांनी मुख्याधिकारी पाटील यांच्यासमोर बंसोड याने त्यांचा आदेश झुगारल्याचे सांगीतले. या प्रकारानंतर कॉंग्रेस पक्षातील नगरसेवकांनी बंसोड याचे त्वरीत स्थानांतरण करण्याची मागणी केली. यावर मुख्याधिकारी पाटील यांनी मागणी करेल त्याला पाण्याचा पुरवठा केला जाईल असे सांगत बंसोड यांचे त्वरीत स्थानांतरण करण्यास राणे यांना सांगीतले.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई