शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राच्या कलेप्रमाणे ‘चंद्रकला’ने वाढविला व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:22 IST

सालेकसा तालुक्याच्या चिचटोला येथील प्रगती स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिव चंद्रकला गेंदलाल शिवणकर यांनी गटातून कर्ज घेवून दुग्ध व्यवसायासाठी एक गाय खरेदी केली.

ठळक मुद्देप्रगती स्वयंसहायता बचत गट : दुग्ध व्यवसायातून सर्व खर्च वगळता सात हजार निव्वळ नफा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सालेकसा तालुक्याच्या चिचटोला येथील प्रगती स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सचिव चंद्रकला गेंदलाल शिवणकर यांनी गटातून कर्ज घेवून दुग्ध व्यवसायासाठी एक गाय खरेदी केली. एका गायपासून दोन गाई व नंतर दुग्ध विक्री सुरू करून आपल्या पूर्वीच्या मजुरी व शेतकामाला बगल दिली. चंद्राच्या कलेप्रमाणे ‘चंद्रकला’ने आपला व्यवसाय वाढविल्याने त्यांना सर्व खर्च वगळता निव्वळ नफा सात हजार रूपये दरमहा मिळत आहे.चंद्रकला बचत गटात येण्यापूर्वी शेतकाम व मजुरी करीत होत्या. गावात तीन बचत गट सुरू होते. सहयोगिनींनी सर्व महिलांनी बचत गट तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांनी १० ते १२ सदस्यांचा गट तयार केला. गटाला सर्व प्रशिक्षणही देण्यात आले. सहा ते बारा महिन्यात गटाचा व्यवहार सुरू झाला. गटाचे ग्रेडेशन व आॅडीट झाले. ते बँक लिंकसाठी पात्र ठरले.यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहयोगिणी उषा पटले यांच्या सहकार्याने गटाचे बँक प्रस्ताव तयार करण्यात आले. गटाला एक लाख ३२ हजार रुपयांचे कर्ज मिळाले. त्यातून चंद्रकला यांनी ६० हजार रूपयांचे कर्ज घेवून गाय खरेदी केली.देखभाल, चारापाणी, दूध काढणे त्या स्वत: करू लागल्या. कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी पुन्हा सीआयएफचे २० हजारांचे कर्ज घेतले. आता त्यांच्याकडे दोन गाई आहेत.दररोज १५ ते २० लिटर दूध होवू लागले. ग्रामसंस्था व माविमच्या मार्गदर्शनातून त्यांच्या विशाल दुग्ध संकलन केंद्राला दूध गावातच मिळू लागले. ३० ते ३२ रूपये लिटर दर मिळत आहे. पशुखाद्य सुद्धा त्याच केंद्रात उपलब्ध आहे.आज त्यांना महिन्याकाठी सात हजार रूपये सर्व खर्च वगळता शुद्ध नफा होत आहे. दूध गावातील दुग्ध डेअरीत जात असल्यामुळे त्यांचा वेळ, येण्या-जाण्याचे श्रम व खर्च वाचत आहे. त्यामुळे त्यांना सीआयएफ व आयसीआयसीआय बँकेची किस्त भरण्यात कधीच अडचण आली नाही. कर्जाची परतफेड त्या नियमित करीत आहेत.त्यांच्या व्यवसायाला आता भरारी मिळाली असून सर्व गरजांची पूर्तता होत आहे. दुग्ध व्यवसायातून त्यांनी आपल्या कुटुंबाचा विकास घडवून आणला.दुग्ध व्यवसायाच्या नव्या दिशेसाठीसालेकसा तालुक्यापासून चिचटोला गाव १८ किमी अंतरावर आहे. कुटुंबसंख्या १५० आहे. माविमच्या सखी लोकसंचालित साधन केंद्रांतर्गत ११ बचत गट आहेत. त्यापैकी प्रगती स्वयंसहायता महिला बचत गट हा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १२ ओबीसी महिलांचा आहे. २० जानेवारी २०१४ रोजी सदर गट उन्नती ग्रामसंस्थेला जोडून आपले सभासद शुल्क देवून दशसूत्रीचा अवलंब करीत आहे. गटाची एकूण बचत ६० हजार रूपये आहे. या गटातील सचिव तथा बुक कीपर चंद्रकला शिवणकर यांनी आपल्या दुग्ध व्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी विविध माध्यमातून माहिती व प्रशिक्षण घेतले. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण व कार्यशाळा, पशुसखींच्या माध्यमातून औषधोपचार व लसीकरण गावातच होत आहे. माविमच्या माध्यमातून वेळोवेळी प्रशिक्षण, पैशाचा विनियोग योग्य होत आहे. तसेच छाणनी समितीच्या देखरेखीमुळे सर्व हिशोब, नियम, परतफेडीची सवय लागून व्यवसायाला नवीन दिशा मिळाली आहे.