शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

दुसऱ्या लाटेची शक्यता,यंत्रणा दक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 05:00 IST

कोरोना संक्रमणाच्या काळात जिल्ह्याला दररोज ३५६ ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. हीच बाब लक्षात घेत दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत २० टक्के ऑक्सिजन सिलिंडर राखीव ठेवण्यात आले आहे. शासकीय तसेच खासगी रुग्णालयाला सुध्दा यासंबंधिच्या सूचना देण्यात आल्या. यासाठी कोविड केअर सेंटर असलेल्या खासगी रुग्णालयाच्या संचालकांची बैठक घेवून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी त्यांना आवश्यक सूचना दिल्या.

ठळक मुद्देआरोग्य विभागाकडून आढावा ; उपाययोजनांची चाचपणी झाली सुरु

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : डिसेंबर आणि जानेवारी मध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच पार्श्व भूमीवर जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यास काय उपाययोजना करायच्या याचे नियोजन आतापासूनच सुरु केले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता रुग्णालयातील २० टक्के बेड राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच खासगी रुग्णालयांना सुध्दा या संदर्भातील सूचना करण्यात आल्या आहे. जिल्ह्यात पूर्वी १६ कोविड केअर सेंटर सुरु होते. मात्र रुग्ण संख्या कमी झाल्याने सध्या स्थितीत केवळ ११ कोविड केअर सेंटर सुरु आहे. मात्र जे कोविड केअर सेंटर सध्या बंद आहेत त्यांना सुध्दा पूर्ववत सज्ज करण्याचे काम सुरु आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात जिल्ह्याला दररोज ३५६ ऑक्सिजन सिलिंडर लागत होते. हीच बाब लक्षात घेत दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत २० टक्के ऑक्सिजन सिलिंडर राखीव ठेवण्यात आले आहे. शासकीय तसेच खासगी रुग्णालयाला सुध्दा यासंबंधिच्या सूचना देण्यात आल्या. यासाठी कोविड केअर सेंटर असलेल्या खासगी रुग्णालयाच्या संचालकांची बैठक घेवून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी त्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच कोविड रुग्णांसाठी ५० टक्के औषधीचा साठा सुध्दा उपलब्ध करुन ठेवण्यात येणार आहे. कोविडसाठी निवड करण्यात आलेल्या सहा खासगी रुग्णालयात २० टक्के बेड सुध्दा राखीव ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. एकंदरीत कोरोनाचा संसर्ग वाढल्यास त्याला वेळीच पायबंद लावण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासन पूर्णपणे कामाला लागला आहे. 

सेंटर, डॉक्टर्स, औषधांसाठी तयारी ५० टक्के औषधांचा साठा राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच ७३ डॉक्टर, ५७ नर्सेस व इतर ४० कर्मचारी आणि ग्रामीण भागासाठी जवळपास ५ हजार डाॅक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा स्टॉफ सज्ज ठेवण्यात आला आहे. 

लाट येऊ नये म्हणून...जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येवू नये यासाठी कोरोनाच्या टेस्टची संख्या वाढविण्यात येणार आहे. समूह संपर्कात येणाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने भाजी विक्रेते, व्यावसायिक यांचा समावेश असणार आहे. माझे कुटुंब माझी जवाबदारी मोहीमे दरम्यान आढळलेल्या गंभीर आजाराच्या रुग्णांवर नजर ठेवली जाणार असून त्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझर यांचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन काटेकोरपणे कसे केले जाईल यावर सुध्दा भर दिला जात आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात राहावा, पुन्हा दुसरी लाट येऊ नये दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाच्या टेस्ट वाढविण्यात येईल. तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांवर आरोग्य यंत्रणेची बारीक नजर राहील.  दीपक कुमार मीणा जिल्हाधिकारी, गोंदिया. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या