शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बीजीडब्ल्यू रुग्णालयातील अस्वच्छतेवरून सीईओ संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:02 IST

येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाला जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी एम.राजा दयानिधी यांनी मंगळवारी (दि.१६) आकस्मिक भेट दिली. तसेच रुग्णालयाच्या परिसराची व स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली.

ठळक मुद्देरुग्णालयाला आकस्मिक भेट : त्वरित सुधारणा करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाला जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी एम.राजा दयानिधी यांनी मंगळवारी (दि.१६) आकस्मिक भेट दिली. तसेच रुग्णालयाच्या परिसराची व स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली. रुग्णालय परिसर व आतील भागात मोठ्या प्रमाणात केरकचरा साचला असल्याचे पाहुन सीईओ दयानिधी चांगले संतापले. त्यांनी यावरुन संबंधित अधिकारी आणि स्वच्छता कंत्राटदाराला चांगलेच धारेवर धरल्याची माहिती आहे. सीईओ दयानिधी यांच्या आकस्मिक भेटीने बीजीडब्ल्यू रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.येथील बीजीडब्ल्यू रुग्णालयाची इमारत फार जुनी असून ती जीर्ण झाली आहे. इमारतीची उंची देखील कमी असल्याने पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी रुग्णालयाच्या महिला वॉर्डात साचले होते. त्यामुळे महिला रुग्णांची चांगली तारांबळ उडाली होती. तसेच रुग्णालयातील स्वच्छतेच्या मुद्दाकडे लोकमतने वृत्त प्रकाशित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याचीच दखल घेत मंगळवारी सीईओ दयानिधी यांनी बीजीडब्ल्यू रुग्णालयाला आकस्मिक भेट देवून पाहणी केली. तसेच मागील वर्षी पावसाळ्यात ज्या वॉर्डात पाणी साचले होते त्याची पाहणी केली.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. तर रुग्णालयातील अस्वच्छतेच्या मुद्दावरुन कंत्राटदाराला चांगलेच धारेवर धरले. तसेच रुग्णालयाचा परिसर त्वरीत स्वच्छ करण्याचे निर्देश दिले. यापुढे रुग्णालयाच्या आवारात केरकचरा आढळल्यास स्वच्छतेचे कंत्राट रद्द करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. यानंतर सीईओ दयानिधी यांनी बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाºयांकडून तेथील समस्यांचा आढावा घेतला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल