शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भिंत फोडून मोबाईल गॅलरीतून पाच लाखाचे मोबाईल चोरी; २८ ॲन्डड्राईड मोबाइल केले साफ

By नरेश रहिले | Updated: October 2, 2023 20:10 IST

आमगावच्या पाणी टाकी जवळील घटना

नरेश रहिले, गोंदिया: आमगावच्या पाणी टाकी जवळील शिवणकर चाळ मध्ये असलेल्या पवार मोबाईल गॅलरीच्या मागणी भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी ७ ते ८ लाख रूपये किंमतीचे मोबाईल पळविल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. दुर्गेश डिगलाल गौतम रा. बंजारीटोला ता. आमगाव यांच्या पवार मोबाईल गॅलरीची भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली.

आमगावच्या गांधी चौक ते कामठा चौक दरम्यान असलेल्या जून्या पाणी टाकीच्या जवळ शिवणकर चाळ आहे. या चाळमध्ये भाड्याने घेतलेल्या खोलीत पवार मोबाईल गॅलरी उघडण्यात आली. १ ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी या मोबाईल गॅलरीच्या मागील भागाची भिंत तोडून त्या मोबाईल गॅलरीतून अत्यंत महागडले असलेले २८ मोबाईल पळविले. त्या मोबाईलची किंमत ५ लाखाच्या घरात सांगितली जाते. या मोबाईल गॅलरीचे मालक दुर्गेश डिगलाल गौतम रा. बंजारीटोला हे २ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता आपली दुकान उघडण्यासाठी आले असतांना त्यांच्या दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते.

आपल्या दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मोबाईलवर आमगाव पोलिस ठाण्यात संपर्क केला. माहिती मिळताच आमगावचे ठाणेदार युवराज हांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत धायगुडे, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर पर्वते व इतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. गोंदियावरून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. परंतु दुकानाच्या मागच्या भागात पावसाचे पाणी साचले असल्यामुळे श्वास त्याच ठिकाणी थांबला. गोंदियावरून फिंगरप्रिंट व स्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. वृत्त लिहीपर्यंत या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.पोलीस अधिक्षकांनी केला दौरा

आमगाव पोलीस ठाण्याचे नियमीत निरीक्षण असल्याने पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांचा आमगाव पोलीस ठाण्याचा दौरा होता. परंतु या घटनेची माहिती मिळाल्याने पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी आमगाव पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती घेतली. कोणत्या पध्दतीने आरोपींनी चोरी केली त्याचा तपास कश्यापध्दतीने करावा यासंदर्भात संबधीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.छोटा छिद्र करून केली चोरी

या मोबाइल गॅलरीच्या मागची भिंत जिर्ण असल्याने त्या जिर्ण भिंतीला सब्बलने खड्डा करुन १० ते १२ वर्षाचा मुलगा आत जाईल एवढाच छिद्र तयार केला. त्या छिद्राला पाहून सडपातळ व्यक्तींनी आत प्रवेश करून ही चोरी केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइल