शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वातंत्र दिन साजरा

By admin | Updated: August 17, 2015 01:39 IST

भारतीय स्वातंत्र्याचा ६९ वा वर्धापन दिन जिल्ह्यात ठिकठिकाणी थाटात साजरा करण्यात आला.

गोंदिया : भारतीय स्वातंत्र्याचा ६९ वा वर्धापन दिन जिल्ह्यात ठिकठिकाणी थाटात साजरा करण्यात आला. रॅली काढून भारतमातेचा जयघोष करून तिरंग्याला सलामी देण्यात आली. आयकर कार्यालय आयकर विभागात भारतीय स्वातंत्र्यांचा ६९ वा वर्धापन दिन थाटात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयकर अधिकरी पंकज शास्त्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी आयकर अधिकारी यशवंत वालदे होते. याप्रसंगी गोंदिया टॅक्स बार असोसिएशन व सी.पी. चॅप्टरचे सर्व सदस्य उपस्थित होते. संचालन अनिल सुखदेवे यांनी केले. कार्यक्रमासाठी अमित गजभिये, अमित सरदार, विलास नंदनवार, संजय नरदे, मनीष चिंचुळकर यांनी सहकार्य केले. मनोहरभाई पटेल मिल्ट्री स्कूल मुख्याध्यापिका रूपा मिश्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी स्वातंत्र दिनाचे महत्व समजावून सांगत विद्यार्थ्यांना देशाप्रती असलेले कर्तव्य पूर्ण करण्याची प्रेरणा दिली. पश्चात विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली. तसेच देशप्रेम, देशभक्ती व अनुशासनाची शपथ घेतली. दरम्यान विद्यार्थ्यांनी भाषण व देशभक्ती गीत सादर केले. संचालन विद्यार्थी कुलांश शर्मा यांनी केले. बंगाली प्राथमिक शाळा बंगाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुब्रत पाल यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव आर.डी. शहा, कोषाध्यक्ष डी. के. मंडल, सदस्य आर.के. राय, एन. सी. शहा, बंगाली शाळेचे मुख्याध्यापक ए.एल. मार्टीन, रवंीद्रनाथ टागोर शाळेचे मुख्याध्यापक एस.एस .ठाकूर उपस्थित होते. याप्रसंगी पाहुण्यांनी स्वातंत्र्यासाठी जीव देणाऱ्या शहिदांची आठवण करीत इमानदारी व सत्याच्या मार्गावर चालून जीवन जगण्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी गीत व भाषण सादर केले. संचालन के.डी. गजबे यांनी तर आभार पी.सी. भुजाडे यांनी मानले. धोटे बंधू विज्ञान महाविद्या. प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी आपला सर्वांगीण विकास करण्याचे आवान केले. संचालन शारिरीक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. एजाज शेख यांनी केले. प्रा. अजय रूखीयाना, प्रा. नरेश असाटी, एनसीसी कॅडेटसह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. गुजराती राष्ट्रीय शाळा गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळाचे उपाध्यक्ष अजय वडेरा यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी ट्रस्ट बोर्ड सचिव हरिहरभाई पटेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव जयेश पटेल, सदस्य विजय जोशी, निलेश पारेख, जितेंद्र परमार, चंद्रेश माधवानी, बिपीन बावीसी, मुख्याध्यापक व्ही.एम.चव्हाण उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. तर खुशी चौरसिया व बबली मुनेश्वर यांनी विचार व्यक्त केले. रेणुकाबेन पटेल स्मृती शिष्यवृत्तीने निखील बावनथडे, महर्षी गुप्ता, मृणालिनी नागदिवे, सिया ठाकूर, अभिषेक झा यांना तर विजय वडेरा यांच्या स्मृतीत हर्षिल भांडारकर, डॉली बिसेन, निधी भगत, शार्दुल तितिरमारे, अयानी मंसूरी, युक्ती कटरे, ओवेस शेख, साई रहांगडाले, वैष्णवी लिल्हारे, सोनिया बिसेन, विश्वनाथ पटले, होमी नागदेवे यांना पुरस्कृत करण्यात आले. संचालन तुषार येरपुडे व अनामिका चव्हाण यांनी केले. आभार डी.बी. दवे यांनी मानले. जन शिक्षण संस्थान छोटापाल चौक येथे संस्था संचालक आर.जे. बोहने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रेय मार्कंडेय होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव रूपाश्री पाल, आशा ठाकूर, संस्था अध्यक्ष डॉ. सूरज पाल, इंजिनीयरिंग सोल्युशनचे संचालक सम्राट पाल, डॉ. बी.जी.ढोरे, निर्मल ठाकूर, डॉ. अकबर अली, नानू दवे, गजानन पंचभाई, एल.पी. सामंतराय, अजय खवसकर, विवेक करोले, रिना डोंगरवार, चंदना घासले, सिराज शेख उपस्थित होते. संचालन विनायक डोंगरवार यांनी तर आभार महेश बिसेन यांनी मानले. यशस्वीतेसाठी शुभांगीनी बंसोड, शशिकला तिवारी, दीपक उईके, रामू कोटांगले, दीपक बोबडे, जयंत बोबडे, सागर बोकडे, गणेश कुथे, अनुप चौरसिया, मनीष जायस्वाल, नरेंद्र बुराडे, जगदीश परमार, राहुल पराते, हरीश आठवले, लाला वडेरा, हितेश दुबे, डॉ. निखिल भरणे, रामदास सोनटक्के आदींनी सहकार्य केले. मालतीदेवी प्राथमिक शाळा पर्यवेक्षक मोनू राठोर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक बाळकृष्ण पटले, शिक्षक सुनिता धपाडे, निर्मला बिसेन, तृप्ती झिंगरे, डिलेश्वरी ठाकूर, स्वीटी अग्रवाल, प्रिया खांडेकर, देवानंद गजभिये, सुनिल हत्तीमारे, सुरेश अटराहे, रामू ढोरे, संदीप टेंभुर्णीकर, महेश तांडेकर, महेश दहीकर, विनोद ठाकरे, रोहीत बागडे, रवीना फेंडारकर, ज्योती मोहबे उपस्थित होते. स्वातंत्र्य प्रभातफेरी काढली होती. देशभक्ती गीत व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रामनगर म्युनिसिपल स्कूल शाळेचे मुख्याध्यापक आर.के. गौतम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विशेष म्हणजे सामाजिक वनिकरण विभागाच्यावतीने शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गडपायले, पर्यवेक्षक जी.एस. चिंधालोरे उपस्थित होते. गडपायले यांनी गीत सादर केले. संचालन ए.सी. जोशी यांनी केले. गोंदिया पब्लिक स्कूल संस्थाध्यक्ष अर्जुन बुद्धे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शारिरीक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमित बुद्धे, मुख्याध्यापक रीता अग्रवाल, शाळा व्यवस्थापक प्रफुल वस्तानी प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी हर्ष नवल, सौम्या चौधरी, स्नेहा संतोष यांना पुरस्कृत करण्यात आले. साई कॉन्व्हेंट व नर्र्सरीसाई कॉन्व्हेंट व नर्सरी शाळेच्या वतीने लहानग्या विद्यार्थ्यांच्या उपस्थित मान्यवर अतिथींच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले. महापुरुषांच्या तैलचित्रावर माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. एस.एस. जायस्वाल, मुख्याध्यापिका अर्चना राऊत, ममता बावनकर, खान, प्रितम सूर्यवंशी, वासुदेव कपाट, जितेंद्र वासनिक उपस्थित होते.म्युनिसिपल हायस्कूल गोविंदपूरमनोहर नगर परिषद माध्य. विद्यालय गोविंदपूर शाखा गोंदिया, मराठी प्राथमिक शाळा गोंदिया खुर्द व हिंदी प्राथमिक शाळा गोंदिया खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या प्रांगणात शाळेतील ज्येष्ठ शिक्षक एस.डी. फुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणून न.प. सदस्य विष्णु नागरिकर, महेंद्र, से.नि. शिक्षक बी.डी. शंकराचार्य, ए.आई. पटले उपस्थित होते. यावेळी म.न.प. माध्यमिक विद्यालय गोविंदपूर शाळेच्या विद्यार्थ्यानी देशभक्तीगीत सादर केले. पर्यवेक्षक अनुराग तिवारी, राधीका यादव यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ व गुणवत्तापूर्ण शिक्षक यावर मार्गदर्शन केले. आर.एस. पटले, ए.जी. ब्राह्मण, एम.एम. नेरलवार, ए.एन. भेंडारकर, बी.एस. पटले, एफ.एम. पुसाम, के.जे. शेख, मीना बिसेन, दुर्गा भदाडे, उदासन सोनवाने, एस.टी. वाढई तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी गोविंद मारवाडे, नामदेव शेंडे व जयशंकर दगडे यांनी परिश्रम घेतले. जयभीम जनजागृती बौद्ध मंडळस्थानिक सम्यक सम्बुद्ध बुद्ध विहार येथे तिरंगी झेंड्याला मानवंदना देण्यात आली. बुद्ध विहारात सामूहिकरित्या राष्ट्रगीत व बुद्ध वंदना ग्रहण करण्यात आली. महिला मंडळाकडून देशभक्तीपर राष्ट्रगान व भीम-बुद्ध गीत सादर करण्यात आले. याप्रसंगी बाबुराव जनबंधू, अतुल सतदेवे, हेमंत बडोले, उदेभान डोंगरे, प्रेमलाल मेश्राम, कार्तिक रामटेके, हंसराज बंसोड, प्रमोद खांडेकर, सचिन राऊतकर, प्रभा गजभिये, वनमाला कोल्हाटकर, छाया जांभुळकर, अनिता गजभिये, गीता कोल्हाटकर उपस्थित होते.फुल-शाहू-आंबेडकरी चळवळीचे संस्कार केंद्रकेंद्राच्या वतीने तिरंगी झेंड्याला मानवंदना देण्यात आली. अशोक चक्र, भारतीय राज्यघटना व त्यांचे रचियता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती देण्यात आली. यावेळी महेंद्र कठाणे, अतुल सतदेवे, स्रेहा गडपायले, राजकुमार जांभुळकर, नवनीता मेश्राम, अजिंक्य उके, सुरभी मेश्राम उपस्थित होते. मनोहर म्युनिसिपल हायर स्कूलध्वजारोहण मुख्याध्यापक उल्हास राजनकर यांनी केले. अध्यक्षस्थानी विजयकुमार शर्मा, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष गोपाल कापसे, माता-पालक संघाचे सदस्य रजनी चांदेवार, नरेंद्र गणवीर, मारोती वाढई, बी.एन. गरनायक, मोना श्रीवास्तव, राजेंद्र धावडे व किशोर तावाडे उपस्थित होते. यावेळी एनसीसीच्या पथकाने पथसंचलन केले. संचालन दर्शना बोरकर यांनी केले. हेमराज शहारे, अजेशकुमार टेकाम, मधुकर जाधव, दुर्गा राठोर, रेखा पाटणकर, संभाजी डोंगरे, दामोदर धुवारे, शिवकुमार उपरीकर, सुलभा चौधरी, सुप्रिया कुर्वे, दीप्ती तावाडे यांनी सहकार्य केले.संजय गांधी प्राथमिक शाळा, लोधीटोला विदर्भ प्रदेश विकास परिषदेचे जिल्हा संयोजक कृष्णा राठोर यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. मुख्याध्यापक लिल्हारे प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी गावात प्रभातफेरी काढली होती. डॉ. भामा विद्यालय, झरपडा सांस्कृतिक विभाग प्रमुख पी.बी. नानोटी यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच तनुरेषा रामटेके होत्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी गावात प्रभातफेरीही काढली होती. प्रास्ताविक मुख्याध्यापक एन.ए. नाकाडे यांनी मांडले. संचालन डी.टी. मेश्राम यांनी केले. आभार पी.एस. बारसागडे यांनी मानले. सोनपुरीजि.प. हिंदी शाळा सोनपुरी येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जामवंता सरवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबुदास मडावी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच सुखदास बसेना, ग्रा.पं. सदस्य झनकलाल उपराडे, घनश्याम मोहारे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष भूमिता सरवरे, ग्रा.पं. सदस्य अर्चना शहारे, कौतिका मोहारे, मनीष पुसाम, देवराज मरस्कोल्हे, काशिराम सुलाखे, सुरेश अंबादे, मलेश लिल्हारे, ग्रा.पं. प्रशासक जे.एन. बोरकर, उच्चश्रेणी मुख्याध्यापक एस.पी. गिरी, आर.के. लिल्हारे, ओ.एच. लिल्हारे, एस.एम. दसरिया, के.डी. नवगोडे, आर.एस. बसोने, अंगणवाडी सेविका सेवंता लिल्हारे, पद्मा अंबादे, शिवराज गिरीया, छबीलाल परतेती, आरोग्य सेवक बी.एस. उके, दशाराम मोहारे, रामचंद माहुले उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत सादर केले.ग्रामपंचायत कहालीतंटामुक्त अध्यक्ष बाबुदास मडावी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रा.पं.चे प्रशासक अधिकारी जे.एन. बोरकर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी माजी सरपच विमला सुलाखे, ग्रा.पं. सदस्य घनश्याम मोहारे, झनकलाल उपराडे, अर्चना शहारे, कौतिका मोहारे उपस्थित होते. संचालन के.डी. नवगोडे यांनी केले. आभार पदवीधर शिक्षक राजकुमार बसोने यांनी मानले. आसोलीके.एम. कोल्हटकर ज्युनियर सायन्स कॉलेज, आसोली येथे सरपंच सयाराम भेलावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे व नवनिर्वाचित सदस्य सारंग भेलावे, शाळा व्यवस्थापन समितीचे अशोक गायधने, पो.पा. पुरनलाल भेलावे, जोशीराम भेलावे व ग्रा.पं.चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्राचार्य विजय टेंभरे यांनी स्वागत केले. संचालन प्रा. बोपचे यांनी केले. नितेश गायधने, पटले, मीनाक्षी मेश्राम, नितेश बोरकर, शालू भांडारकर यांनी सहकार्य केले. आभार नितेश गायधने यांनी मानले. पांढरीजि.प. प्राथमिक शाळा डुंडाचे ध्वजारोहण ओमप्रकाश बिसेन, अंगणवाडी केंद्रात पुष्पा उके व ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण प्रज्ञा ठलाल यांनी केले. जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा पांढरीचे ध्वजारोहण विनोद वाघाडे, विविध सेवा सहकारी पत संस्थेत दिलीप डागा, ग्रामपंचायत कार्यालय पांढरीचे ध्वजारोहण अनिल मेंढे व गोंगले रेल्वे स्थानकाचे ध्वजारोहण नितेश आर. बन्सोड यांनी केले. ध्वजारोहण विलास उईके, प्राथमिक आरोग्य केंद्र पांढरीचे गणेश गुंड यांनी केले.गुरूदेव सेवा मंडळ पदमपूरश्री गुरूदेव सेवा मंडळ पदमपूर येथील ध्वजारोहण आकडू वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष अशोक चुटे यांनी केले. (ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून )