शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

गणेशोत्सव शांततेत साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 00:38 IST

यावल येथे बैठकीत अपर पोलीस अधीक्षक मतानी यांचे आवाहन

यावल, जि.जळगाव : गणेशोत्सवाची सुरूवातीपासून तर निर्विघ्नपणे विसर्जन होईस्तोवर आदर्श आचारसंहितेचे पालन करून उत्साहात गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी बुधवारी येथील पोलीस ठाण्यात शहर व तालुक्यातील गणेश मंडळांच्या पदाधिकारी बैठकीत केले.मिरवणुकीसाठी डी.जे.ला अजिबात परवानगी नाही. पारंपरिक वाद्याचाच वापर करा आणि आपल्या संस्कृतीचे जतन करा, असा सल्लाही त्यांनी दिला. बैठकीस भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, तहसीलदार कुंदन हिरे, पोलीस निरीक्षक डी. के. परदेशी उपस्थित होते.आगामी गणेशोत्सव व पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी येथील पोलीस ठाण्याच्यावतीने आयोजीत केली होती. याप्रसंगी बोलताना मतानी यांनी सांगितले की, उत्सव काळात मंडळाच्या पदाधिकाºयांनी अतिशय दक्ष राहून उत्सव साजरा करावयाचा आहे. अनेक वेळा उत्सवा दरम्यान आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यासाठी अग्नीप्रतीबंधक साधणे मंडपात असणे गरजेचे आहे. तसेच ‘श्री’च्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवरही नजर ठेवा, कोणी अनोळखी अथवा संशयित इसम वाटल्यास तत्काळ पोलिसांना कळवा, यासह उत्सव काळात व मिरवणुकीच्या दिवशी श्री च्या मूर्तीची विटंबना होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले. मिरवणुकीच्या वाहनावर दर्शनी भागात मंडळाचे पदाधिकारी यांचे मोबाइल नंबर्सचा फलक लावा, मिरवणुकीत कोणी गैरप्रकार करीत असताना आढळल्यास पोलीस त्याच्यावर कायदेशीर कारवाई करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. उत्सव काळापासून तर विसर्जनापर्यंतच्या अवलोकनानंतर पोलिसांकडून पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसंगी डीवायएसपी राठोड यांनीही मनोगत व्यक्त केले.राष्ट्रीय मानवअधिकार संस्थेकडून उत्कृष्ट गणेशोेत्सव मंडळांना प्रथम १५०१ व चषक, व्दितीय १००१ व चषक आणी तृतीय ५०१ आणि चषक असे बक्षीस देण्याची घोषणा प्रसंगी अ‍ॅड.नितीन चौधरी यांनी केलीबैठकीत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बºहाटे यांनी गणेश मंडळांना शासनाची मातृवंदना योजना, स्वाईन फ्ल्यू, गोवर लसीकरण आणि रूबेला आजारासंदर्भात जनजागृती करण्याचे आवाहन केले तर गोवर, रूबेला आजाराचे सन २०१९ अखेर उच्चाटन करण्याचा निर्धार ओराग्य विभागाचा असुन त्यास ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील बालकांना या काळात लसीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे यांनी केले.

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल