भाजप तालुकाध्यक्ष धनलाल ठाकरे तसेच भाजप कार्यकर्त्यांकडून तालुक्यातील प्रत्येकच गावात भाजपचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. सोबतच माजी आमदार अग्रवाल यांच्या कार्यालयातही स्थापना दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारतमाता, दीनदयाल उपाध्याय व माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या छायाचित्रांना माल्यार्पण व पूजन करण्यात आले तसेच भाजपाचा ध्वज फडकवून वंदन करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार अग्रवाल, तालुकाध्यक्ष ठाकरे, परमेश्वर ठाकरे, गोपालबाबा खरकाटे, टिकाराम भाजीपाले, छाया दसरे, वाय.पी. रहांगडाले, रुद्रसेन खांडेकर, जगतराय बिसेन, भास्कर रहांगडाले, गेंदलाल शरणागत, विजय लोणारे, संतोषसिंह घरसेले, बाबूलाल पटले, डॉ. देवेंद्र रहांगडाले, लोकचंद दंदरे, अमृत तुरकर, अंकेश हरिणखेडे, योगराज रहांगडाले, शोभेलाल पारधी, प्रीतमलाल मंडिया, अशोक लिचडे, अशोक मेंढे, अरुण दुबे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
ध्वजारोहण करून स्थापना दिन साजरा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST