नृत्यविष्कारासह बोधप्रद नाटिका : कार्यक्रमांनी रसिकांना केले मंत्रमुग्ध अर्जुनी-मोरगाव : लोकमत सखी मंच व ललीता टेंभरे, वंदना शहारे (दिक्षांत व कांचन टी स्टॉल), सरोज दुबे (बालाली कॅटरर्स) व मंजुषा तरोणे (मयुरी ब्युटी पार्लर) यांच्या सहकार्याने स्थानिक प्रसन्न सभागृहात २१ डिसेंबर रोजी आयोजीत सखींचा वार्षिकोत्सव थाटात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रांजली भांडारकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रतिमा फुंडे, वंदना शहारे, प्रज्ञा गणवीर, पोर्णिमा शहारे, पद्मना मेहेंदळे, हर्षा राऊत (संयोजिका सडक अर्जुनी), गीता ब्राम्हणकर, सपना उजवणे, शशीकला निमजे, सुशीला गंधे, सुधा कापगते, सुचित्रा जोशी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व ज्योत्सना दर्डा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ या प्रार्थनागीताने करण्यात आली. कार्यक्र मात नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन अव्वल ठरलेल्या कल्पना काकडे यांना प्रथम, स्नेहल राठी द्वितीय व अर्चना बोरकर व स्नेहल मेश्राम तृतीय यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच याच कार्यक्रमात नवीन संयोजिका म्हणून ममता भैय्या यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दुपारी १ ते ५ पर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात समूह नृत्य, एकल नृत्य, लघूनाटिका, गीत गायन, कॉमेडी एक्सप्रेस या कार्यक्रमांचा समावेश होता. या विविधरंगी महोत्सवात सर्वप्रथम गणेश वंदना मयुरी तरोणे हिने सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच स्वागतगीत पाशा ब्राम्हणकर, उमा ब्राम्हणकर, वृंदा कोरे यांनी गायले. त्यानंतरच्या कार्यक्रमात ‘नारी के रुप’ अनेक हे समूहनृत्य, लावणी, कत्थक नृत्य, पावर आॅफ वुमन वर आधारित नृत्य, ‘वृद्ध माँ-बाप की दशा’ हे नाटक सादर करण्यात आले. सखींनी त्यांच्यातील नृत्यकला व गायिकेचे सुप्तगूण दाखवून सर्वांना आर्श्यचकित केले. चंदा वंजारी यांनी स्वत: रचलेली कविता म्हणून दाखविली. सर्व कार्यक्रम अतिशय सुरळीतपणे व उत्साहाने पार पडले. प्रिती खोब्रागडे हिने सुंदर रांगोळी काढून कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रमाला तृप्ती मेश्राम, स्नेहा काळे, चित्रा ठेंगरी, रेणू जायस्वाल, संध्या मेश्राम, प्रिती खोब्रागडे, नंदिनी धकाते, कल्पना काकडे, वर्षा काकडे, मंजुषा तरोणे, कुंदा लाडसे, विना मेश्राम, नयना तरोणे, स्नेहा गजापुरे, निरा मुरकुटे, अश्विनी भावे, अश्विनी घनाडे, सरीता शुक्ला, शुभांगी शिवणकर, मंदा शिवणकर, ललीता टेंभरे, वनिता खुणे, शेंदरे, आराध्या खोब्रागडे, लावण्या धकाते, विधी, अंजली, अर्चना परमार, मेघा मडावी, सरस्वती गांधी, सिद्धी लिमजे, दीपाली दुधे, कांचन गुप्ता व अनेक सखींनी भाग घेतला होता. सखी मंच संयोजिका नंदिनी धकाते यांनी वार्षिक अहवाल व प्रस्तावना सादर केली. कार्यक्रमाचे संचालन करून आभार संयोजिका ममता भैय्या यांनी मानले.कार्यक्रमासाठी वर्षा काकडे, स्नेहा काळे, कांचन यावलकर, नीता लांजेवार, अश्विनी घनाडे, स्नेहल मेश्राम यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
सखींचा वार्षिकोत्सव उत्साहात
By admin | Updated: December 28, 2016 02:46 IST