दोघे गंभीर : दोन्ही वाहनांचे मोठे नुकसानआमगाव : आमगाव ते गोंदिया मार्गावरील दहेगाव आणि अदासी यादरम्यान इंडिका कार आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. यात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना परस्पर उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.प्राप्त माहितीनुसार रविवारी पहाटेच्या सुमारास इंडिका कार आमगावकडून गोंदियाकडे जात होती. याचवेळी अदासी येथील एक रिकामा ट्रॅक्टरला समोरून येत असताना त्यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की ट्रॅक्टरचा समोरील भाग चकनाचूर झाला. त्याची चाकेही उखडून गेली. विशेष म्हणजे या अपघातासंदर्भात कोणत्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाही.या मार्गावर गेल्या काही दिवसात अपघातात सतत वाढ होत आहे. त्यामुळे वळणांवर विशेष फलक लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे. वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे हे अपघात होत आहेत. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)
भरधाव ट्रॅक्टरची कारला धडक
By admin | Updated: February 2, 2016 01:38 IST