शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

सालेकसा तालुक्यातील ८४७७ नागरिकांना काेरोना प्रतिबंधात्मक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 05:00 IST

तालुक्यात एकूण ७९ हेल्थ केअर वर्करना लस देण्यात आली असून त्यापैकी १९ लोकांना पहिला डोस तर ६० लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहे. फ्रंट लाईन वर्करपैकी एकूण २५० लोकांना लस देण्यात आली असून त्यामध्ये एकूण २०९ लोकांना पहिला डोस तर ४१ लोकांना दोन्ही डोस देण्यात आला आहे. ४५ ते ६० वर्ष वयोगट आणि गंभीर आजार असलेल्या तालुक्यातील एकूण ३ हजार ५९५ लोकांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ३४७४ लोकांना पहिला डोस तर १२१ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 

ठळक मुद्देसाडेतीनशे लोकांना दुसरा डोज : साडेचारशे डोस गेले वाया

विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील एक महिन्यापासून ४५ वर्षावयापेक्षा वरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. आतापर्यंत सालेकसा तालुक्यात एकूण ८ हजार ४७७ लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. दरम्यान, एकूण ४५३ डोस वाया गेल्या असून एकूण प्राप्त लसीपैकी पाच टक्के मात्र वाया गेली आहे. २६ एप्रिलपर्यंत आरोग्य विभागाकडून तालुक्याला एकूण ९ हजार २५० डोस प्राप्त झाले. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध २६५० डोस मिळाले. त्यापैकी २५३७ डोस उपयोगात आले व ११३ डोस वाया गेले. प्राथमिक आरोग्य केंद्र सातगावला २२९० डोस मिळाले. त्यापैकी १ हजार ८३५ डोस लावण्यात आल्या असून तब्बल २४५ डोस वाया गेले. अर्थात एकूण प्राप्त मात्रेच्या ११ टक्के मात्रा वाया गेल्या. बिजेपार प्राथमिक आरोग्य केंद्राला एकूण २ हजार ११० डोस मिळाले. त्यापैकी १ हजार ९५० डोस उपयोगात आले असून ६० डोस वाया गेले. दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राला एकूण २२०० डोस मिळाले. त्यापैकी २ हजार १५५ डोस उपयोगात आणल्या असून ३५ डोस वाया गेल्या. तालुक्यात सरासरी पाच टक्के डोस वाया गेले तर एकूण ३२० ङोस शिल्लक राहिल्या. परंतु कावराबांध प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही लस शिल्लक नसून सातगाव २१०, बिजेपार १०० आणि दरेकसा येथे १० असे शिल्लक होत्या. त्यांचा उपयोग सुरू असून आता संपूर्ण तालुक्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. तालुक्यात एकूण ७९ हेल्थ केअर वर्करना लस देण्यात आली असून त्यापैकी १९ लोकांना पहिला डोस तर ६० लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहे. फ्रंट लाईन वर्करपैकी एकूण २५० लोकांना लस देण्यात आली असून त्यामध्ये एकूण २०९ लोकांना पहिला डोस तर ४१ लोकांना दोन्ही डोस देण्यात आला आहे. ४५ ते ६० वर्ष वयोगट आणि गंभीर आजार असलेल्या तालुक्यातील एकूण ३ हजार ५९५ लोकांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ३४७४ लोकांना पहिला डोस तर १२१ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. कावराबांध प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ ते ६० वर्षांतील एकूण १११२ लोकांनी डोस लावला. त्यात १०५५ लोकांनी पहिला तर ५७ लोकांनी दुसरा डोस घेतला. सातगाव केंद्रात ७३८ लोकांना पहिला डोस आणि ३९ लोकांनी दुसरा डोस घेतला. बिजेपार केंद्रात ८७४ लोकांनी पहिला डोस घेतला परंतु दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या शून्य आहे. दरेकसा केंद्रात ८०७ लोकांनी पहिला डोस आणि २५ लोकांनी दुसरा डोस लावून घेतला आहे.

लसीकरणात ज्येष्ठ नागरिक पुढे६० वर्षापेक्षा अधिक वयाच्या एकूण ४७९६ लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतला असून त्यामध्ये ४६७३ लोकांनी पहिला ङोस तर १२३ लोकांनी दोन्ही डोस लावून घेतला आहे. त्यामध्ये कावराबांध केंद्रात १४३६ लोकांना पहिला डोस तर ७० लोकांचा दुसरा डोस झाला आहे. सातगाव केंद्रात ९७८ लोकांना पहिला डोस तर ५१ लोकांना दुसरा डोज झाला आहे. बिजेपार केंद्रात आतापर्यंत पहिलाच डोस देण्यात आला आहे. यात १०१३ लोकांचा समावेश आहे. 

लसीबद्दल जनजागृतीची गरजतालुक्यात लसीकरण मोहीम ज्या गतीने चालत आहे. यावरून असे दिसत आहे की ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिक स्वयंस्फूर्तपणे कोरोनाची लस घेण्यासाठी पुढे येताना दिसत नसून आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला डोससुद्धा घेतला नाही. अशात लसीकरण मोहीम राबविताना लोकांमध्ये जनजागृती अभियानसुद्धा चालविण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस