शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावर केरकचरा टाकणे १३५ जणांना भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:38 IST

रेल्वे स्थानकावर केरकचरा टाकणाऱ्या दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र यानंतरही बरेच प्रवाशी याकडे दुर्लक्ष करतात.

ठळक मुद्दे१० दिवसांत २० लाखांचा दंड वसूल : विशेष तिकीट तपासणी अभियान

ऑनलाईन लोकमतगोंदिया : रेल्वे स्थानकावर केरकचरा टाकणाऱ्या दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र यानंतरही बरेच प्रवाशी याकडे दुर्लक्ष करतात. मात्र हे दुर्लक्ष करणे १३५ प्रवाशांना भोवले असून त्यांना रेल्वे विभागाच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. रेल्वे स्थानकावर कचरा केल्याप्रकरणी १३५ जणावर कारवाई करुन त्यांच्याकडून १२ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे प्रवाशांचे धाबे दणाणले आहे.रेल्वे स्थानक परिसर नीट नेटका ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. मात्र यानंतरही बरेच प्रवाशी रेल्वे स्थानकावर केरकचरा टाकतात. अशा प्रवाशांवर नजर ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई कारवाई केली जात आहे. याच अंतर्गंत दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मंडळातंर्गत दहा दिवस मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली.दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळातून धावणाºया प्रवासी गाड्या व मुख्य स्थानकांमध्ये १९ ते २० फेब्रुवारीपर्यंत विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. या १० दिवसांच्या अभियानात एकूण ८०६० प्रकणांची नोंद करून २०.६६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.दपूम रेल्वे नागपूर मंडळाद्वारे वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांच्या नेतृत्वात, वाणिज्य विभागाच्या अधिकाºयांच्या पुढाकारात, तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या सहकार्याने मंडळाच्या विविध लोहमार्गावरून धावणाºया एकूण ३३२ प्रवाशी गाड्या व मुख्य स्थानकांमध्ये विविध विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले.या अंतर्गत विनातिकीट/अनियमित प्रवास तसेच माल बुक न करता लगेज नेण्याचे ८०६० प्रकरणे नोंद करण्यात आले. त्यांच्याकडून एकूण २० लाख ६६ हजार १७० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.सहायक मंडळ वाणिज्य व्यवस्थापक ओ.पी. जायस्वाल यांनी तिकीट निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या सहकार्याने २४ फेब्रुवारीला भंडारा रोड स्थानकात किलेबंदी चेकींग केली. येथून ये-जा करणाºया २८ प्रवासी गाड्यांमध्ये विनातिकीट/अनियमित प्रवास तसेच माल बुक न करताच लगेज नेण्याचे ८२५ प्रकरणे एकाच दिवसात नोंदविण्यात आले. त्यांच्याकडून दंडस्वरूपात एक लाख ६९ हजार ७२५ रूपयांची वसूल करण्यात आला. १० दिवसांच्या विशेष तपासणी अभियानात ही वसुली सर्वाधिक ठरली.रेल्वे प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची असुविधा होवू नये यासाठी योग्य तिकीट घेवूनच प्रवास करावा, असे आवाहन दपूम रेल्वे नागपूरचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांनी केले आहे.