शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानक परिसर घाणीच्या विळख्यात

By admin | Updated: September 11, 2015 02:07 IST

जिल्हयातील मुख्य बसस्थानक परिसर घाणीने माखलेला आहे. प्रचंड दुर्गंधी व कचऱ्यामुळे समस्येत अजून वाढ झाली आहे.

जुना बसस्थानकाची दुरवस्था : दुर्गंधीमुळे रहदारीवरही परिणाम, मानसिकता बदलण्याची गरजभंडारा : जिल्हयातील मुख्य बसस्थानक परिसर घाणीने माखलेला आहे. प्रचंड दुर्गंधी व कचऱ्यामुळे समस्येत अजून वाढ झाली आहे. आगार प्रशासन या समस्येकडे लक्ष देईल काय असा प्रश्न नागरिक विचारित आहेत. भंडारा जिल्हयातील सर्वात मोठे बसस्थानक म्हणून भंडारा बसस्थानकाची ओळख आहे. विशेष म्हणजे जिल्हयाचे मुख्यालय असल्याने अनौपचारिकपणे बसस्थानकाचे क्षेत्रफळ मोठे असणे स्वाभाविक आहे. दशकभरापूर्वी नविन बसस्थानकाची निर्मिती झाल्यानंतर जुन्या बसस्थानक परिसरात सुरक्षेची व स्वच्छतेची काळजी घेण्यात आली नाही. बसस्थानक चौक ते बसस्थानकाच्या आऊटर मार्गापर्यंतचा भाग बसस्थानक परिसर म्हणून ओळखला जातो. बसस्थानकाच्या उत्तर पूर्व दिशेला कांजीहाऊस आहे. पश्चिम दिशेला भंडारा तुमसर हा राज्य मार्ग आहे. दक्षिण दिशेला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकूल व जलतरण तलावाचा परिसर आहे. तर पूर्व दिशेला झोपडपट्टीचा परिसर आहे. नविन बसस्थानकाची निर्मिती झाल्यानंतर जुना बसस्थानकाच्या परिसरातून रसना लॉजकडे जाण्यासाठी एक लहान गल्ली होती. याच गल्लीतून मोठा बाजार परिसरातून येणारे प्रवासी आजही येतात. मात्र या परिसरात प्रचंड दुर्गंधी आहे. जागोजागी कचरा साचलेला आहे. काही वर्षांपूर्वीच प्लाझा नामक व्यापारी संकुलाची भव्य इमारत बांधण्यात आली. त्यामुळे जुन्या बसस्थानकाचा भाग दाबल्या गेला. तद्वतच जुना बसस्थानक व नविन बसस्थानक वेगवेगळे असल्यासारखे वाटू लागले. विशेष म्हणजे हा सर्व परिसर एकच आहे. जुन्या बसस्थानकातील ओट्यांची दुरावस्था झाली आहे. शेळ्या मेंढा व अन्य बेवारस जनावरे येथे फिरत असतात. या जागेचा खुलेआम लघुशंकेसाठी व शौच करण्यासाठी वापर करण्यात येतो. त्यामुळेही दुर्गंधीत वाढ झाली आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य प्रमाणात नालीचे बांधकाम नसल्याने दिवसरात्र पाणी वाहत राहते. उघड्यावरच लघूशंका केली जात असल्याने येथून जाणाऱ्या प्रवाशांना तोंडावर रुमालच घेवून जावे लागते. बसस्थानक परिसराला लागून असलेल्या इमारती व अन्य दूकानांमधील कचरा पेटीत न घालता तो थेट जुन्या बसस्थानक परिसरात सर्रासपणे फेकला जातो. पंतप्रधानानी संपूर्ण भारतभर स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. त्याप्रमाणात वेळोवेळी उपक्रमही केले जातात. मात्र बसस्थानक परिसरातील स्वच्छतेच्या बाबतीत आगाराने अद्यापही दखल घेतलेली नाही. दुर्गंधीमुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे असतानाही स्वच्छतेची मोहिम का राबविण्यात येत नाही अशा सवाल नागरिकांच्या मनात घोंघावत आहे. विशेष म्हणजे बसस्थानक परिसरातील डांबरीकरण उघडले असल्याने या समस्येत अजून भर पडली आहे. गिट्टी उखडलेली असल्याने बसच्या चाकाखाली सापडून गिट्टी केव्हा प्रवाश्यांच्या अंगावर येईल याचा नेम नाही. मध्यंतरी आगार प्रशासनाने भरण घालून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पावसाळयात हा प्रयत्न सपेशल फेल ठरला आहे. भंडारा बसस्थानक आगार प्रशासन या समस्यांकडे लक्ष देईल काय? व सुधारणा होईल काय? असा प्रश्न वारंवार विचारित आहे. व्यवस्थापनाने याकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)