शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तणसाचे ढीग जळून भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 21:01 IST

येथील शेतकरी हऊसलाल नागपुरे यांच्या घरासमोर ठेवलेल्या तणसाच्या ढिगाला अचानक आग लागून संपूर्ण तणस भस्मसात झाला. शुक्रवारी (दि.१) रात्री १० वाजतादरम्यान ही घटना घडली असून यात नागपुरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांच्याकडील जनावरांच्या चाºयाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देजनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न : नुकसान भरपाईची शेतकऱ्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : येथील शेतकरी हऊसलाल नागपुरे यांच्या घरासमोर ठेवलेल्या तणसाच्या ढिगाला अचानक आग लागून संपूर्ण तणस भस्मसात झाला. शुक्रवारी (दि.१) रात्री १० वाजतादरम्यान ही घटना घडली असून यात नागपुरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांच्याकडील जनावरांच्या चाºयाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.उन्हाळी धान पिकाची मळणी झाल्याने पावसाळ््यात जनावरांच्या चाºयाची सोय म्हणून हऊसलाल नागपुरे यांनी दुसऱ्या शेतकऱ्याकडून तीन ट्रॅक्टर तणस खरेदी केले होते. तणसाचे हे ढिगारे त्यांनी आपल्या घरासमोर अंगणात ठेवले होते. दरम्यान शुक्रवारी (दि.१) रात्री १० वाजताच्या सुमारास अचानकच तणसाच्या ढिगाला आग लागली. आगीच्या ज्वालांची धग बघून गावात एकच खळबळ माजली.यावर गावातील ताराचंद बंसोड, खुशाल शहारे, मनोज शहारे, देवराम मानवटकर, लच्छू कुरसुंगे, धनलाल नागपुरे, सुरजोती नागपुरे यांनी वामन लांजेवार यांच्या घरातील बोअरवेलचे पाणी उपसून आगीला नियंत्रीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीमुळे तणसाचे ढिग जळून भस्मसात झाले. यात नागपुरे यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले असून त्यांच्याकडे असलेल्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तणस जळून झालेल्या नुकसानाची शासनाने भरपाई देण्याची मागणी नागपुरे व गावकºयांनी केली आहे.विशेष म्हणजे, या आगीवर वेळीच पाण्याचा मार केल्याने आग पसरली नाही व अन्य अप्रिय घटना घडली नाही. कारण, तणसाचे ढिग होते तेथून थोड्याच अंतरावर नागपुरे यांचे घर आहे. तणस हलके असल्याने उडून घराकडे गेले असते तर त्यातून आग पसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र गावकºयांनी वेळीच पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा धोका टळला.

टॅग्स :fireआग