.......
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात नवीन असेच काहीच नाही. त्यामुळे सर्वसामान्यांची निराशा झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलवर कृषी शेष आकारल्याने ते अजून महागणार असून, याचा फटका शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प निराशजनक आहे.
- राजेंद्र जैन, माजी आमदार
......
शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट हमीभाव तसेच पाच नवीन कृषी हब आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाची रेल्वेने वाहतूक केल्यामुळे शेतकरी निश्चितच बळकट होईल. असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना किमान वेतन देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या तरतुदी चांगल्या आहे. मात्र पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्याने थोडी निराशा झाली असून, यावर विचार करण्याची गरज आहे.
- विनोद अग्रवाल, आमदार
......
हा अर्थसंकल्प आम आदमी, करदाते, महिला सुरक्षा आणि रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने काहीच नाही. कोरोना महामारीपूर्वी ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी कुठल्याच उपाययोजना करण्यात आल्या नाही. मोठ्या खासगी कंपन्याचे खासगीकरण करून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न केला जात आहे तर ग्रामीण भागासाठी लाइफलाइन असलेल्या मनरेगासाठीसुद्धा यात कुठलीच तरतूद नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे.
- विनोद जैन सीए.
......
कृषीसाठी एक लाख ३१ हजार कोटी, इन्फ्रास्ट्रक्चर एक लाख १८,००० कोटी, रेल्वेसाठी एक लाख दहा हजार कोटी आदी प्रमुख क्षेत्रांबरोबरच एमएसएमई क्षेत्रासाठीदेखील भरीव तरतुदीमुळे देशात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. देशात सक्षम आरोग्यव्यवस्था निर्माण करण्यासाठी ७३,००० कोटींची भरभक्कम तरतूददेखील करण्यात आली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे निर्माण झालेले आर्थिक संकट असूनदेखील देशातील जनतेला कुठलीही करवाढ न करता आत्मनिर्भर भारताच्या निर्मिताला गती देणारा अर्थसंकल्प आहे
-सुनील मेंढे, खासदार
......
अर्थसंकल्पात एमएसएमई क्षेत्रासाठीदेखील भरीव तरतुदीमुळे देशात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. आरोग्यविषयक सुविधा आणि पायाभूत सुविधांवर प्रामुख्याने भर देण्यात आल्याने खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास साधणार हा अर्थसंकल्प आहे.
- अशोक लंजे, माजी जि.प. सभापती
......
या अर्थसंकल्पात आम आदमीसाठी कसलीही तरतूद नाही. व्यापाऱ्यांना जीएसटीमध्ये कसल्याही सुविधा नाही, तर महिला सुरक्षेच्या दृष्टीनेसुद्धा कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंबंधी कुठल्याही उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही.
- सहषराम कोरोटे, आमदार
.......
या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य जनतेला फार अपेक्षा होत्या. कोरोनामुळे अनेकांचा राेजगार गेला असल्याने त्यांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्याची आशा होती; पण त्यांचीसुद्धा निराशा झाली आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनेसुद्धा या अर्थसंकल्पात काहीच नाही.
- मनोहर चंद्रिकापुरे, आमदार.