शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

बकी गेटमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:30 IST

राजेश मुनीश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे एक प्रवेशव्दार सडक-अर्जुनी तालुक्यातील कोहमाराजवळ बकी गेट आहे. मागील दोन तीन वर्षांपासून हे बंद होते. मात्र वन्यजीव विभागाने बकी गेट सुरू केल्याने येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी पर्वनीच ठरत आहे. कोहमारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वरुन तीन किमी अंतरावर बकी गेट तयार ...

ठळक मुद्देपर्यटकांची झाली सोय : सोयी सुविधेत वाढ करण्याची गरज

राजेश मुनीश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे एक प्रवेशव्दार सडक-अर्जुनी तालुक्यातील कोहमाराजवळ बकी गेट आहे. मागील दोन तीन वर्षांपासून हे बंद होते. मात्र वन्यजीव विभागाने बकी गेट सुरू केल्याने येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी पर्वनीच ठरत आहे. कोहमारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वरुन तीन किमी अंतरावर बकी गेट तयार करण्यात आले आहे. या गेटवरुन सडक-अर्जुनी, देवरी, गोरेगाव, गोंदिया, साकोली, रायपूर या शहराकडून पर्यटक पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात भेट देत असल्याची नोंद आहे.मागील वर्षी व्याघ्र प्रकल्पातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे बकी गेट बंद ठेवण्यात आले होते. आता प्रकल्पातील अंतर्गत रस्ते, नाल्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या १ आॅक्टोबर २०१७ पासून बकी गेट पुन्हा पर्यटकांसाठी नियमित सुरु करण्यात आले आहे. पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात जाण्याकरिता आॅनलाईन व आॅफलाईन बुकींगची सुविधा वन्यजीव विभागाने उपलब्ध करुन दिली आहे. नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ १५२.५८ चौ. कि. मी. आहे. नवेगाव व्याघ्र प्रकल्प विविधतेने नटलेले अभयारण्य असून पर्यटकांसाठी भूषण ठरत आहे. जिल्ह्यातील पर्यटकांना जाण्यासाठी सडक- अर्जुनी तालुक्यातील बकीगेट हे सोयीचे ठरत आहे. या गेटमुळे पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पातील झनकारगोंदी तलाव, कालीमाटी, कवलेवाडा गवत व कुरणाचे रान पाहयला मिळत आहे. व्याघ्र प्रकल्पात आता मानवाचे वास्तव्य नसल्यामुळे प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पर्यटकांना कालीमाटी, कवलेवाडा, झलकारगोंदी तलाव टी के जार्इंट पार्इंट या ठिकाणी वन्यप्राण्यांचे दर्शन हमखास होते. त्यामुळे या ठिकाणाला भेट देण्यासाठी पर्यटकांचा आग्रह असतो. पर्यटनाचा खरा आनंद हा उन्हाळ्याच्या दिवसात सकाळी व सायंकाळच्या वेळी अभयारण्यात येतो. नवेगाव व्याघ्र प्रकल्पात विविध औषधीयुक्त वनस्पती पहावयास मिळतात. हा परिसर जैवविविधतेने नटलेला असल्यामुळे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. बकी गेट येथे वनरक्षक आनंद गावले तर वनक्षेत्र सहायक सुनील भोंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बकी गेटमुळे कोसबी परिसरातील बेरोजगारांना सुगीचे दिवस येतील.रस्ता दुरुस्तीची गरजबकी गेटला जाण्यासाठी कोसबीमार्गे जावे लागते. कोसबी ते बकी गेटपर्यंत जाण्याचा खडीकरणाचा रस्ता हा ठिकठिकाणी उखडला आहे. गिट्टी बाहेर निघाली असल्याने या मार्गावरुन ये-जा करण्यास अडचण निर्माण होते. त्यासाठी वन्यजीव विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.स्थानिकांना मिळाला रोजगारबकी गेटच्या माध्यमातून कोलारगाव, कोसबी, बकी, मेंडकी, कोहमारा गावातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. बकी गेट याठिकाणी गाईडची सुविधा आहे. वन्यजीव विभागाने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोहमारा ते कोसबी गावापर्यंत विविध प्राण्याचे चित्र, मार्गदर्शक फलक येथे लावण्याची गरज आहे.