शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

संपतीच्या वादातूनच केला भावाचा खून

By admin | Updated: June 18, 2014 00:15 IST

संपत्तीच्या वादातून महिन्याभरापूर्वी दोन भावांमध्ये वाद झाला. त्याचा वचपा काढण्यासाठीच लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. ही घटना गुरूवारच्या

गोंदिया : संपत्तीच्या वादातून महिन्याभरापूर्वी दोन भावांमध्ये वाद झाला. त्याचा वचपा काढण्यासाठीच लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. ही घटना गुरूवारच्या रात्री ११ वाजता आमगाव तालुक्याच्या शिवनी येथे घडली. दरम्यान यातील लहान भावासह इतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.शिवनी येथील भागवत गणपत तावाडे (३५) यांचे त्याच्या पत्नीशी काही दिवस न पटल्यामुळे ती माहेरी गेली होती. परंतु १७ एप्रिलला तिला भागवतने आपल्या घरी परत आणले. त्याचा राग भागवतचा लहान भाऊ वासुदेव गणपत तावाडे (२६) याला होता. या शिवाय वासुदेवने व भागवतने दोघांनी वाहन खरेदी केले होते. त्यामुळे वासुदेववर कर्ज होते. ही कर्जाची परतफेड करण्यासाठी वासुदेवने जमीन विक्रीची गोष्ट आपल्या आईवडीलांसोबत केल्यामुळे माझ्या हिस्याची जमीन विकू नका, असे भागवतने म्हटले होते. त्यामुळे महिन्याभरापूर्वी दोन्ही भावांचे भांडण झाले. या भांडणाचा वचपा काढण्याच्या चंग वासुदेवने बांधला. त्यासाठी त्याने कट रचला. भागवतकडे टाटा सुमो गाडी असल्याने ती गाडी भाड्याने चालत होती. त्यासाठी जवरी येथील एका महिलेच्या प्रसुतीसाठी तिला गोंदियाला न्यायचे आहे, असा फोन एका मोबाईलवरून निलाराम शंकर तावाडे (३८) या भागवतच्या काके भावाला आला. त्यामुळे निलारामने त्याला वाहन नेण्यास सांगितले. त्यावर भागवतने जवरीचे लोक पैसे देत नाही मी जात नाही, असे म्हटल्यावर निलारामने मी पैसे देईल तू गरीबांची सेवा कर, बाळतीणीला घेऊन जा, असे म्हटल्यावर भागवत बाळंतीणीला घेण्यासाठी टाटा सुमो एमएच २७/डी-७२९ घेऊन निघाला. वाटेत वाहनात डिझेल भरण्यासाठी तो आमगावला आला. त्याच्या वाहनात जवरी येथील दोन युवक बसले होते. डिझेल भरून ही टाटा सुमो किंडगीपारवरून जवरीकडे जात होती. या टाटा सुमोला दूरवरून पाहणाऱ्या वासुदेव तावाडेने दुचाकीने पाठलाग करून अर्ध्या रस्त्यावर टाटा सुमोच्या समोर आपली दुचाकी उभी केली. गाडीत असलेल्या दोघांनी व वासुदेवने ठरल्याप्रमाणे भागवतला टाटा सुमोच्या खाली उतरवून बांध्यामध्ये नेले. तेथे त्याला लोखंडी रॉडने मारले. परंतु भागवतने कशीबशी सुटका करून त्याच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न केला. ३०० मीटर अंतर धावत कापणारा भागवत रक्त्याच्या थारोळ्यात होता. धावता-धावता त्याचा पाय एका बांधीच्या धुऱ्याला अडकल्याने तो खाली पडला. याचाच फायदा आरोपींनी घेतला. त्याचा पाठलाग करणाऱ्या आरोपींनी त्याला अखेर ठार केले. त्यानंतर त्याला नवेगाव रस्त्यावरील कालव्याजवळ नेऊन गाडीसह कालव्यात ढकलले आणि हा अपघात वाटावा असा प्रयत्न आरोपींनी केला. या घटनेसंदर्भात आरोपी वासुदेव गणपत तावाडे (२६), निलाराम शंकर तावाडे (३८) दोन्ही रा.शिवनी व जवरी येथील हुमे कुटूंबातील दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी अपघाताचा देखावा करण्याचा प्रयत्न केला, परंतू या घटनेचे पुरावे काही वेगळे सांगत होते. या घटनास्थळाला पाहणारे हा खूनच असावा असे बोलत होते. या घटनेसंदर्भात सुरूवातीला आमगाव पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदविला होता. परंतु तपासात सदर खून असल्याचे उघडकीस आले. या घटनेत आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३०२, १२० ब, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वासुदेव तावाडे हा मद्यप्राशन करीत नाही. परंतु घटनेच्या दिवशी त्याने मद्यप्राशन केले होते. सदर आरोपींना अटक करण्याची कारवाई पोलीस निरीक्षक डी.बी.मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस.पवार, शरद शेळके, हवालदार राऊत, विनोदकुमार बरैया यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)