शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ, जिल्हा परिषदेची निवडणूक होईल का रे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 05:00 IST

ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. पण ओबीसी जागा वगळून नव्हे, तर एकत्रित निवडणुका घेण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकार या निवडणुका स्थगित करून नंतर एकत्रित निवडणुका घेण्याचा निर्णय घेते का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. परिणामी या निवडणुकांवरून आता तर्कवितर्क लावले जात असून, भाऊ. निवडणूक होईल का रे ! असेच एकमेकांना विचारले जात आहे. 

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्हा परिषद, पंचायत समितीची आणि नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया जोमात आली असताना, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. पण ओबीसी जागा वगळून नव्हे, तर एकत्रित निवडणुका घेण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे राज्य सरकार या निवडणुका स्थगित करून नंतर एकत्रित निवडणुका घेण्याचा निर्णय घेते का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. परिणामी या निवडणुकांवरून आता तर्कवितर्क लावले जात असून, भाऊ. निवडणूक होईल का रे ! असेच एकमेकांना विचारले जात आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या ५३ आणि पंचायत समितीच्या १०६ व तीन नगरपंचायतींच्या ५१ जागांसाठी २१ डिसेंबरला निवडणूक होणार होती. यासाठी १ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आता पूर्ण झाली असून १३ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने आता ओबीसी प्रवर्गाच्या जि. प. १०, पं. स. २० आणि नगरपंचायतीच्या ६ जागा वगळून उर्वरित जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र ओबीसी जागांवरील निवडणुकीस निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याने या निवडणुकीतील उत्साह आता कमी झाला आहे. उमेदवारच नव्हे, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये सुध्दा यावरून उत्साह मावळल्याचे चित्र आहे. त्यातच या सर्व प्रक्रियेवर १३ डिसेंबरला सुनावणी होणार असून त्यानंतरच या निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. त्यामुळे गावातील चावडी आणि शेकोट्यांवर सध्या, भाऊ, जिल्हा परिषदेची निवडणूक होईल का रे ! हीच एकमेव चर्चा ऐकायला मिळत आहे. 

निवडणूक झाली तरी सत्तेचा पेच कायम राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ४३ आणि आणि पंचायत समितीच्या ८६ व नगरपंचायतीच्या ४५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीचा निकाल लागला तरी, अध्यक्ष व सभापती पदाची निवडणूक होणार नाही. त्यामुळे सत्ता कोणाची, हा प्रश्न कायम राहणार असून तोपर्यंत निवडून आलेल्या सदस्यांना केवळ नाममात्र राहावे लागणार आहे. 

सर्वच पक्ष म्हणतात... निवडणूक नको. मग आग्रह कुणाचा !-ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. ज्या पक्षाची राज्यात सत्ता आहे, त्या पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी आणि विरोधी पक्षाचे पदाधिकारी व नेते सुध्दा हीच मागणी करीत आहेत. मग या निवडणुका घेण्याचा आग्रह नेमका कुणाचा आहे, हे कळण्यास मात्र मार्ग नाही. उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला-ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाने सर्वच पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा उत्साह मावळल्याचे चित्र आहे. वेगवेगळ्या निवडणुका घेण्यापेक्षा एकत्रितच निवडणुका घेण्यात याव्यात. तोपर्यंत या निवडणुका स्थगित करण्याची मागणी केली जात आहे. 

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद