शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हाडीने घाव घालून भावाने केला भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 06:00 IST

६ डिसेंबर रोजी दुपारी २.४५ वाजता सुंदरनगर परिसरातील राधाकृष्ण वॉर्डातील सरकारी तलावाच्या बाजूला असलेल्या रेल्वे मैदानावरील पिंपळाच्या झाडाखाली बारीकराव वाघाडे बसले होते. यावेळी आरोपी गुणाराम सिताराम वाघाडे (४५) हा कुऱ्हाडी घेवून मागून आला व बारीकराव यांच्यावर कुऱ्हाडीने तीन घाव घातले. रक्तबंबाळ बारीकरावला उपचारासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले.

ठळक मुद्देतीन दिवस मृत्यूशी झुंज: आरोपीला गुरूवारपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वारंवार होत असलेल्या वादातून धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घातले. यात गंभीर जखमी झालेल्या थोरल्या भावाने तीन दिवस मृत्यूशी झुंज दिली. अखेर सोमवारी (दि.९) सकाळी उपचारादरम्यान नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्याचा मृत्यू झाला. बारीकराव सीताराम वाघाडे (५०,रा. सुंदरनगर) असे मृताचे नाव आहे.६ डिसेंबर रोजी दुपारी २.४५ वाजता सुंदरनगर परिसरातील राधाकृष्ण वॉर्डातील सरकारी तलावाच्या बाजूला असलेल्या रेल्वे मैदानावरील पिंपळाच्या झाडाखाली बारीकराव वाघाडे बसले होते. यावेळी आरोपी गुणाराम सिताराम वाघाडे (४५) हा कुऱ्हाडी घेवून मागून आला व बारीकराव यांच्यावर कुऱ्हाडीने तीन घाव घातले. रक्तबंबाळ बारीकरावला उपचारासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याचे पाहून उपचारासाठी नागपूरला रवाना केले.आरोपी गुणाराम मद्याच्या धुंदित होता व मला मारल्यामुळे मी बदला घेतला असे तो आपल्या पत्नीला म्हणत होता. त्याची पत्नी प्रमिला गुणाराम वाघाडे (३२) यांनी पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहायक पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर, नितीन सावंत, पोलीस कर्मचारी राजू मिश्रा, जागेश्वर उईके, छगन विठ्ठले, तुलसीदास लुटे, निरज भगत, वेदक, चकोले, प्रकाश गायधने, सुबोध बिसेन, महेश मेहर, विनोद शहारे यांनी घटनास्थळ गाठून आरोपीला पोलीस ठाण्यात आणले. नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना सोमवारी (दि.९) सकाळी बरीकराव यांचा मृत्यू झाला. गोंदिया शहर पोलिसांनी सुरूवातीला आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला १२ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आता बारीकरावचा मृत्यू झाल्याने गुन्ह्यातील कलमात वाढ होणार आहे. सदर आरोपीची पोलीस कोठडीही वाढणार आहे.

टॅग्स :Murderखून