शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

ढिसाळ नियोजनामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:21 IST

नगर परिषदेला अतिक्रमण हटाव मोहीमेसाठी मुर्हुत सापडत नव्हता. मात्र बऱ्याच कालावधीनंतर मुहूर्त सापडल्यानंतर सोमवारपासून (दि.२६) पासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात केली.

ठळक मुद्देन.प.चे भूमिअभिलेख विभागाकडे बोट : मोहीमेसाठी पुन्हा तारीख

ऑनलाईन लोकमतगोंदिया : नगर परिषदेला अतिक्रमण हटाव मोहीमेसाठी मुर्हुत सापडत नव्हता. मात्र बऱ्याच कालावधीनंतर मुहूर्त सापडल्यानंतर सोमवारपासून (दि.२६) पासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात केली. पण, अतिक्रमण नसलेल्यांना सुद्धा न.प.च्या नगर रचना विभागाने नोटीस बजावली. परिणामी नगर परिषदेला अर्ध्यावरच मोहीम थांबवावी लागली. मोहीम सुरु करण्यापूर्वी योग्य नियोजन केल्याचा या मोहिमेला फटका बसला.शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येमुळे मुख्य रस्ते दिवसेंदिवस अधिक अरुंद होत चाललेले आहे. यामुळे शहरात वाहतुकीच्या कोंडीचे चित्र नेहमीच पाहयला मिळते. याचा फटका शहरवासीयांना बसत आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून शहरातील अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.अतिक्रमण हटाव मोहीमेबाबत नगर परिषदेचा अनुभव चांगला नाही. अतिक्रमण हटाव मोहीमेदरम्यान मारहाणीचे प्रकार सुध्दा घडले आहेत. तर बरेचदा राजकीय अडचण आड येत असते. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यासाठी नगर परिषदेकडून तारीख पे तारीख दिली जात होती. पण, बऱ्याच कालावधीनंतर नगर परिषदेला अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याचा मुर्हुत सापडला. भूमिअभिलेख विभागाकडून अतिक्रमणीत जागेची मोजणी करण्यात आली. त्यानंतर सोमवारपासून (दि.२६) शहरातील कुडवा चौक ते एनएमडी कॉलेजपर्यंतचे अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली.मात्र या दरम्यान अतिक्रमण नसलेल्या काही जणांना नोटीस बजाविण्यात आली. पण, त्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले नाही. त्यामुळे इतर अतिक्रमणधारकांनी यावर आक्षेप घेत आमचे अतिक्रमण हटविले मग त्यांना का सुट असा सवाल न.प.मुख्याधिकाºयांना उपस्थित केला. ज्यांना नोटीस बजाविण्यात आली त्यांचे अतिक्रमण नसून न.प.नगररचना विभागाच्या चुकीमुळे त्यांना नोटीस गेल्याचे सांगितले.मात्र नगररचना विभागाच्या चुकीमुळे मोहीमेदरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली. तसेच अधिकाºयांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.त्यामुळे नगर परिषदेला अर्ध्यावरच मोहीम थांबवावी लागली. मंगळवारपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात होईल, या प्रतिक्षेत नागरिक होते. मात्र नियोजन फसल्याने अतिक्रमण हटाव मोहीम लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती नगर परिषदेच्या अधिकाºयांनी दिली.पालिकेने फोडले भूमिअभिलेख विभागावर खापरअतिक्रमण हटाव मोहीमेदरम्यान नोटीस बजाविण्यावरुन वाद निर्माण झाला. तेव्हा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी भूमिअभिलेख विभागाने दिलेल्या मोजणीच्या यादीनुसारच नोटीस बजाविल्याचे सांगितले. त्यावेळीच भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्ही दिलेल्या यादीत संबंधित अतिक्रमणधारकांची नावे नसल्याचे सांगितले. ही चूक नोटीस काढणाऱ्या नगररचना विभागाची असल्याचे सांगीतले तेव्हा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली.