शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
4
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
5
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
6
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
7
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
8
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
9
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
10
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
11
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
12
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
13
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
14
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
15
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
16
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
17
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
18
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
19
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
20
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'

दारूच्या बाटल्यांवर ब्रेड-बिस्कीटची सोय

By admin | Updated: November 1, 2014 23:10 IST

दिवाळी म्हणजे लहान मुलांसाठी नवीन कपडे, गोडधोड खाण्याचा आणि फटाके उडविण्याचा आनंद देणारा सण, पण गोरगरीब कुटुंबातील व्यसनाधीन बापांच्या मुलांच्या नशिबी हा आनंद आलाच नाही.

गोंदिया : दिवाळी म्हणजे लहान मुलांसाठी नवीन कपडे, गोडधोड खाण्याचा आणि फटाके उडविण्याचा आनंद देणारा सण, पण गोरगरीब कुटुंबातील व्यसनाधीन बापांच्या मुलांच्या नशिबी हा आनंद आलाच नाही. त्यांना वडिलांनी ढोसलेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या विकूनच आपल्या ब्रेड-बिस्कीटची सोय करावी लागत आहे.सकाळी चहासोबत ब्रेड-बिस्कीट देण्याची ऐपत नसलेल्या वडिलांची मुले बापाने फस्त केलेल्या दारूच्या बाटलीवर ब्रेड-बिस्कीट खरेदी करतानाचे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक घरांत सकाळीच ‘बाबा’ दारूचा पव्वा कुठे आहे, हा स्वर कानी पडतो. मुलाला १ रुपयाचे ब्रेड खरेदी करून देण्याची ऐपत नसलेला पिता मात्र रोज ३५ ते ४० रुपयांची दारू ढोसतो. हे विदारक चित्र जिल्ह्यात पहावयास मिळते.महाराष्ट्र शासन तंटामुक्तीच्या माध्यमाने गावात दारूबंदी करण्यास प्रोत्साहन करते. एकीकडे शासनच दारू परवाने, दारू काढण्यास, विक्री करण्यास प्रोत्साहन करते. शासनच नियम धाब्यावर बसवते. सरकार स्वतच्या स्वार्थासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची ऐशीतैशी करते. महात्मा गांधी तंटामुक्त एकही गावात दारूबंदी नाही. फक्त कागदावरच नावाचा उदोउदो करण्यासाठी पोलिस खोटा अहवाल सादर करण्यास बाध्य करतात. या कालावधीत अनेक घटना घडून गेल्या. दारूबंदीची पुरती वाट लागली आहे. रोजगाराअभावी दारूविक्री करून उदरभरण करणारा स्वतंत्र वर्ग समाजात निर्माण झाला आहे. पाण्याचा पैसा कमविणारे समाजात प्रतिष्ठित म्हणून पुढे आले आहेत. जिल्ह्यात रोजगाराचे साधन नाही. मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या भरमसाठ आहे. हातावर आणून पानावर खाणारेही कमी नाहीत. दिवसभरातील कामाचा क्षण घालविण्यासाठी दारूचा घोट पोटात रिचविल्या जाते. दिवसभर अंगमेहनत करून ६० ते ७०रुपये मजुरी हाती पडते. ही मजुरी मिळविण्यासाठी दिवसभर काम करावे लागते. त्या कामाचा क्षण घालविण्यासाठी कामावलेले अर्ध्यापेक्षा जास्त रुपये खर्च होतात. कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी ओढाताण सहन करावी लागते. फाटक्या शर्टाने, विनाचपलांनी हातात पुस्तक घेऊन मुलगा शाळेत जातो. पोटात दोन वेळचे अन्न मिळत नाही. तरीही वडील दारू पितात. वडिलांकडे पैशाची मागणी केली तर पाठीवर थपाटा मिळेल, ही भीती त्यांना असते.