शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

व्यसनमुक्तीसाठी ब्रह्माकुमारीज्चा पुढाकार

By admin | Updated: January 22, 2016 02:48 IST

विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जात असलेल्या भावी पिढीला त्यापासून परावृत्त करण्यासाठी ब्रजापिता

गोंदिया : विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जात असलेल्या भावी पिढीला त्यापासून परावृत्त करण्यासाठी ब्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी माझे गोंदिया- व्यसनमुक्त गोंदिया’ असे घोषवाक्य रूढ करून जिल्ह्यातील प्रत्येक शाळा-महाविद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांमध्ये जनजागृती केली जाईल, अशी माहिती या संस्थेच्या व्यसनमुक्ती शाखेचे डॉ.सचिन परब यांनी गुरूवारी येथे पत्रकारांना दिली.याबाबत अधिक माहिती देताना डॉ.परब यांनी सांगितले की, आता बहुतांश शिक्षक व्यसनाधीन झाले आहेत. काही जण तर विद्यार्थ्याच्या हातूनच खर्रा बोलवतात. यामुळे खर्रा, तंबाखूचे व्यसन करण्यात गैर काही नाही अशी विद्यार्थ्यांनी भावना होऊन ते सुद्धा अल्पवयात व्यसनाच्या आहारी जातात. वास्तविक शाळा-महाविद्यालयांपासून १०० यार्डाच्या अंतरावर तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करता येत नाही. पण कायद्याचे पालन कोणीही करीत नाहीत. बहुतांश लोकांना तर कायद्याची माहितीच नसते. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात सर्रास चोरट्या मार्गाने दारू विक्री केली जाते. खर्ऱ्याची बंदी सर्वत्र असली तरी खर्रा सहज मिळतो. केवळ कायदा करून होणार नाही किंवा दारूची विक्री बंद करून हे सर्व थांबणार नाही, त्यासाठी दुष्परिणामांची माहिती देऊन जनजागृती करून मागणी कमी केली जाऊ शकते. त्यासाठी राजयोगाच्या (मेडिटेशन) माध्यमातून कोणत्याही व्यसनापासून मनुष्याला परावृत्त केले जाऊ शकते, फक्त त्याची व्यसन सोडण्याची तयारी असली पाहीजे असे डॉ.परब यांनी सांगितले.मुख्यमंत्री आणि राज्याच्या शिक्षण विभागाकडून या संस्थेला शाळा-महाविद्यालयात जनजागृती करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या पत्रपरिषदेला बी.के.जयश्री बहन, बी.के.मीना बहन, बी.के.अलका बहन, गोंदियाच्या संचालिका बी.के.रत्नमाला बहन, तसेच विनोद हरिणखेडे, त्रिलोकचंद बग्गा, महेंद्र ठाकूर, जितेंद्र अग्रवाल, हरसूकभाई आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)वाढतेय वेगवेगळे व्यसन४केवळ दारू किंवा तंबाखूचेच व्यसन नाही तर आजकाल मुलांमध्ये मोबाईल-इंटरनेटचेही व्यसन जडत आहे. यामुळे अनेक पालक चिंताग्रस्त आहेत. त्यापासून त्यांना परावृत्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून शाळांनी-पालकांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे डॉ.शेंडे म्हणाले.युवकांना वाचवणे गरजेचे४तंबाखूमुळे देशात दरवर्षी १० लाख लोक मरण पावतात. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. आम्हाला कोणाचाही व्यवसाय बंद करायचा नाही, पण युवकांना वाचवायचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा-कॉलेजमध्ये काऊन्सिलिंग केली जाणार असल्याची माहिती डॉ.परब यांनी दिली. यात नंतर परिणामकारक शाळांना व्यसनमुक्त शाळा म्हणून घोषित केले जाईल.