शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

दोन्ही डोस लावण्यासाठी लागू शकतात दोन वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:30 IST

गोंदिया : जिल्ह्यात १८-४४ गटाच्या लसीकरणाला परवानगी मिळाल्यानंतर लसीकरणाची गती वाढली होती व लसींचा तुटवडा जाणवत होता. मात्र ...

गोंदिया : जिल्ह्यात १८-४४ गटाच्या लसीकरणाला परवानगी मिळाल्यानंतर लसीकरणाची गती वाढली होती व लसींचा तुटवडा जाणवत होता. मात्र आता लसींचा नियमित पुरवठा होत असतानाही लसीकरणासाठी नागरिकांकडून दिरंगाई होत असल्याचे दिसत असून लसीकरणाची गती मंदावली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४३.६२ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असून यातील ३४.७५ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर फक्त ८.८७ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यामध्ये अशीत स्थिती राहिल्यास नागरिकांना दोन्ही देण्यासाठी दोन वर्षे लागतील असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

------------------------------

१) आतापर्यंत झालेले लसीकरण

एकूण संख्या पहिला डोस झालेले प्रमाण (टक्के) दुसरा डोस झालेले प्रमाण (टक्के)

आरोग्य कर्मचारी १०५८० १०२८५ ९७.१६ ६१३५ ५७.९९

फ्रंट लाईन वर्कर्स २४३१२ २४३१२ १०० १२६४२ ५२

१८ ते ४४ वयोगट ६२४५८२ १५३७९३ २४.६१ १३५८६ २.१७

४५ ते ५९ २८१२६३ १७०९३४ ६१ ४९८७५ १८

६० पेक्षा जास्त १९८१०२ ९२३३७ ४७ ३२९९३ १७

जिल्ह्यात असे झाले लसीकरण

तारिख दिवसाचे लसीकरण एकूण झालेले लसीकरण

पहिल्या दिवशी किती जणांना मिळाली लस -

१ फेब्रुवारी ५४९ १२०८३ १ मार्च ५३५ ६७७७४

१ एप्रिल ३२१८ ७९३४९

१ मे १३९९ ८८८५१

१ जून ५०४३ १८८०५७

१ जुलै ६१५ १२७४९३

२६ जुलै ३५०५ १२७४९३

----------------------

१९० केंद्रांत सुरू आहे लसीकरण

जिल्ह्यात लसीकरणावर चांगलाच जोर दिला जात असून नागरिकांची सोय व्हावी व त्यांना लसीकरणासाठी इतरत्र भटकण्याची गरज पडू नये यासाठी जिल्ह्यास्तरावर जिल्हा व उपजिल्हा रूग्णालयांसह प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपक्रेंद्रांतही लसीकरण केले जात आहे. अशाप्रकारे सध्या १९० लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू असून यामुळेच आतापर्यंत जिल्ह्यातील ५६६८९१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

-------------------------------

लसीकरण का वाढेना

जिल्ह्यात सध्या शेतीचा हंगाम सुरू असून ग्रामीण भागातील नागरिक शेतीच्या कामात व्यस्त आहेत. कोरोना लॉकडाऊनमुळे कित्येकांच्या हातचे काम गेले असून आता शेतीच्या कामातून त्यांचा उदरनिर्वाह चालत आहे. कोरोनाची लस घेतल्यावर ताप येतो व अशात २-३ दिवसांची रोजी बुडणार या भीतीने नागरिक लसीकरण टाळत आहे. शिवाय जिल्ह्यातून कोरोनाची लाट ओसरली असून आता फक्त ११ रूग्णच उरले आहेत. यामुळे कोरोनाप्रती असलेली भीती निघून गेली असून आता लस घेण्याची काय गरज असेही नागरिकांना वाटू लागले आहे.

------------------------

लवकरच घेणार लसीचा डोस

तिरोडा येथे लसीकरण सुरू आहे. मात्र सध्या शेतीची कामे सुरू असून अशात कोरोनाची लस घेतली व ताप आला तर कामे खोळंबणार. यामुळे आतापर्यंत लस घेतली नाही. आता कामे आटोपून लसीचा डोस घेणार आहे.

- निहारीलाल दमाहे

--------------------------------

रोवणीची कामे सध्या जोमात असून एक दिवसाचाही खंड पडल्यास कामे खोळंबणार. गावात लसीकरण सुरू असूनही आम्ही याच कारणामुळे लस घेतली नाही. शिवाय आता जिल्ह्यातून कोरोना गेला आहे. त्यामुळे कामे आटोपून कोरोनाची लस घेणार.

- रमेश नागपूरे