शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पर्यटन विकासाला निधीचा बूस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:26 IST

शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालयाने गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन व तिर्थक्षेत्र विकासासाठी १५ कोटी रु पयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निधीतून जिल्ह्यातील पर्यटन विकासाची विविध विकास कामे करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर : पर्यटनाला मिळणार चालना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालयाने गोंदिया जिल्ह्यातील पर्यटन व तिर्थक्षेत्र विकासासाठी १५ कोटी रु पयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निधीतून जिल्ह्यातील पर्यटन विकासाची विविध विकास कामे करण्यात येणार आहे. पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या पाठपुराव्यामुळे या विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.शासन निर्णयात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या विकासाठी ४ कोटी ९४ लाख ५ हजार रु पये, प्रतापगड तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी ४ कोटी ८८ लाख ४३ हजार रूपये, नागझिरा (मुरदोली) पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी ४ कोटी ८९ लाख रुपये आणि बोदलकसा येथे १२५ केव्हीए जनीत्र संच व विद्युतीकरणासाठी १२ लाख ८८ हजार असे एकूण १४ कोटी ८४ लाख ३५ हजार रूपये मंजूर केले आहे.पर्यटन विकासाच्या कामाला त्वरीत सुरूवात व्हावी यासाठी तातडीने ५० लाख रुपयांचा निधी वितरीत केला आहे. मंजूर निधीतून नवेगावबांध येथे प्रवेशद्वार, सरंक्षण भिंत, इंटरक्षण हॉल, सार्वजनिक प्रसाधनगृह, वाहनतळ, नैसर्गिक ट्रेल, १.१५ किमी. रस्त्याची दुरूस्ती, १.८५ किमी. नवीन रस्ता निर्मिती, लॉन, पाथवे, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, इनफॉर्मल सेटींग असे अनेक कार्य करण्यात येणार आहे.प्रतापगड येथे प्रसाधनगृह, उपहारगृह, संरक्षण भिंत, प्रवेशद्वार व सिक्युरीटी कॅबीन, लॉन, गार्डन, जमीन विकास, वाहनतळ, पदपथ,पाणी पुरवठा पाईप लाईन, पोहच रस्ता, अंतर्गत बाह्य विद्युतीकरण, ४ हायमास्ट लाईट आदी विकास कामे करण्यात येणार आहे.नागझिरा येथे इंटरप्रिटेशन सेंटर, रेस्टॉरेंट, दोन पर्यटन कक्ष, इनफॉर्मल सेटींग, संरक्षण भींत, सिक्युरिटी कॅबीन, प्रवेशद्वार, लॉन डेव्हलपमेंट, बंधारा, लॉन, वाहनतळ, पाथवे, पोहच रस्ता, नैसिर्गक ट्रेल, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण आदी कामे केली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.