शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेततळी ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:50 IST

मागील वर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकºयांना मोठा फटका बसला.एकीकडे जलयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना पूरेपूर पाण्याची सोय झाली नसताना कृषी विभागाच्या मदतीने तयार करण्यात आलेले शेततळे कृषी क्षेत्राला आधार ठरत आहे.

ठळक मुद्देमागेल त्याला शेततळे योजना : सिंचनासाठी झाली मदत

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : मागील वर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकºयांना मोठा फटका बसला.एकीकडे जलयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना पूरेपूर पाण्याची सोय झाली नसताना कृषी विभागाच्या मदतीने तयार करण्यात आलेले शेततळे कृषी क्षेत्राला आधार ठरत आहे. मागेल त्याला शेततळे योजनेतून तयार करण्यात आलेल्या शेततळ्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असल्याचे दिलासा दायक चित्र तालुक्यात आहे.तालुक्यात ३० हजार हेक्टरच्या जवळपास सिंचनाचे क्षेत्र आहे. कटंगी मध्यम प्रकल्प व कलपाथरी मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी पिकासाठी पाणी दिले जाते. मात्र तालुक्यातील बरीच शेती नैसर्गिक पावसावर अवलंबून असल्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका तालुक्यातील शेतकºयांना दरवर्षी बसतो.तालुक्यातील शेतकºयांना कालव्याचा पाण्याचा आधार मिळत नसल्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतीला पाणी पुरवठा होणे शक्य नाही. त्यामुळे या कालावधीत फळबाग व ठिंबक सिंचनावर घेतल्या जाणाऱ्या पिकांना कृषी विभागाच्या मदतीने तयार करण्यात आलेले शेततळे वरदान ठरत आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये कृषी विभागाने जलयुक्त शिवार योजनांची कामे राबविली. मात्र यामध्ये पाहिजे त्याप्रमाणात पाणीसाठा नाही. मात्र मागेल त्याला शेततळे या योजनेतंर्गत तयार करण्यात आलेल्या शेततळ्यांच्या माध्यमातून लाखो लिटर पाणी साठवून ठेवून त्याचा सिंचनासाठी उपयोग करण्यास शेतकºयांना मदत होत आहे. मार्च २०१६ पासून कृषी विभागाकडून मागेल त्याला शेततळे या योजनेच्या माध्यमातून शेततळे तयार करणाºया शेतकऱ्यांला जास्तीत-जास्त ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. गोरेगाव तालुक्यात मागेल त्याला शेततळे योजनेतून २०१६-२०१८ या वर्षात १३५ शेततळे पूर्ण करण्यात आली. तर सन २०१८-१९ या वर्षात १४१ शेतकऱ्यांना शेततळ्यांसाठी आॅनलाईन मंजुरी देण्यात आली.यापुर्वी २०१६ मध्ये तत्कालीन तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने यांनी मागेल त्याला शेततळी योजनेतून शंभर टक्के शेततळयाची कामे करुन तालुक्याला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून दिला होता. त्याचीच पुनरावृत्ती यंदाही होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती