शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वेतनासाठी शिक्षकांनी तयार केले लसीकरणाचे बोगस सर्टिफिकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 05:00 IST

नरेश रहिले  लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल पाटील यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन ...

नरेश रहिले लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल पाटील यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतल्याशिवाय जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे जिल्ह्यातील काही शिक्षकांनी चक्क लस घेतल्याचे दोन्ही प्रमाणपत्र मिळविले. हे प्रमाणपत्र जेव्हा वेतनासाठी वेतन पथक कार्यालयात दाखल करण्यात आले, तेव्हा हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे लक्षात आले.गोंदिया जि. प. चे मुकाअ अनिल पाटील यांनी गंभीर आजार वगळता सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी, असा आग्रह धरला होता. सुरुवातीला १५० शिक्षकांनी लस घेतली नव्हती. त्यांना नोटीस देताच त्यांनी लस घेतली. त्यानंतर मुकाअ पाटील यांनी दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय त्यांना वेतन मिळणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र वेतन बिल काढणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे सादर केले. कोरोना लसीचे बोगस सर्टिफिकेट सादर करण्यात आले. पहिला आणि दुसरा लसीचा डोस एकाच तारखेला कसा? दोन्ही डोसमध्ये अंतर ठेवण्याचे निर्देश केंद्र सरकारचे असताना गोंदिया जिल्ह्यातील ज्या शिक्षकांनी लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केले ते दोन्ही डोसची एकाच तारखेचे आहेत. एकाच कर्मचाऱ्याने पहिला डोस आणि दुसरा डोस घेतला त्या दोन्ही डोसच्या वेळी एकच बॅच नंबर कसा? हा प्रश्न आहे. हा बोगस सर्टिफिकेटचा प्रकार अर्जुनी-मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आढळला.

बोगससर्टिफिकेट एकाच आरोग्य कर्मचाऱ्याचे नाव कसे? -  कोरोना लसींचे डोस झालेल्या प्रमाणपत्रावर एकाच आरोग्य कर्मचाऱ्याचे नाव असते. अर्जुनी-मोरगाव ग्रामीण रुग्णालयातील एका या आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना व्हॅक्सिन दिल्याचे प्रमाणपत्रावरून समजते.१४ एप्रिललाच दोन्ही डाेस कसे? -  दोन्ही लसींचे डोस घेणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर १४ एप्रिल रोजी दोन्ही डोस घेतल्याचे नमूद आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसच्या वेळी एकच बॅच नंबर कसा मिळू शकतो, हा संशोधनाचा विषय आहे.

त्या कर्मचाऱ्यांची चौकशी कधी? -  वेतन काढण्यासाठी वेतन पथक कार्यालयाला लस घेतल्याचे बोगस प्रमाणपत्र जोडणारे ११ जणांची नावे पुढे आली. वेतन पथक कार्यालयाने याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयाला कळविली. यावर अद्याप कसलीच कारवाई झाली नाही. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या