शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियामध्ये विसर्जनावेळी तलावात बुडालेल्या तरुणाचा सापडला मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 12:05 IST

शारदा विसर्जनाकरिता गोंदिया येथील विठ्ठल रुख्मिणी तलावावर गेलेला तरुण तलावात बुडाला. ही घटना मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली.

गोंदिया : शारदा विसर्जनाकरिता गोंदिया येथील विठ्ठल रुख्मिणी तलावावर गेलेला तरुण तलावात बुडाला. ही घटना मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. तरुणाचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचा-यांच्या मदतीने बुधवारी (4 ऑक्टोबर) सायंकाळी 7 वाजेपर्यंत शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र तरुणाचा शोध लागला नव्हता. दरम्यान गुरूवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास तलावात एक मृतदेह तरंगताना काही नागरिकांना आढळला. याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता तो त्याच तरुणाचा असल्याची खात्री पटली. 

अंकुश राजेश उके (वय 19 वर्ष )असे तलावात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. गोविंदपूर मार्गावरील एका सार्वजनिक शारदा उत्सव मंडळातर्फे स्थापन करण्यात आलेल्या शारदादेवीचे विसर्जन मंगळवारी रात्री छोटा गोंदिया परिसरातील विठ्ठल रुख्मिणी तलावात करण्यात आले. अंकुश सुध्दा त्याच्या मित्रांसह शारदा विसर्जनाकरिता या तलावावर गेला होता. दरम्यान अंकुश आणि त्याचा मित्र तलावात उतरले. मात्र काही वेळानंतर त्याचा मित्र बाहेर आला पण अंकुश बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या मित्राने तलाव परिसरात त्याचा शोध घेतला मात्र तो कुठेच आढळला नाही. मंगळवारी रात्री उशीरा ही घटना उघडकीस आल्याने रात्री तलावात शोध मोहीम राबविता आली नाही. दरम्यान बुधवारी सकाळी 7 वाजतापासून स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने तलावात नावेच्या मदतीने शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र सायंकाळी 7 वाजेपर्यंत तरुणाचा शोध लागला नव्हता. दरम्यान गुरूवारी (5 ऑक्टोबर ) सकाळी 7 वाजताच्या सुमारास फिरायला जाणा-या काही नागरिकांना तलावात मृतदेह तरंगाताना आढळला. याची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तलावात मृतदेह बाहेर काढला. दरम्यान अंकुशच्या कुटुंबीयांना बोलावून तो मृतदेह अंकुशचाच असल्याची खात्री पटवून घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील श्वविच्छेदनगृहात पाठविला. दरम्यान नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती. 

कुटुंबीयांची दोन दिवसांपासून धडपड मंगळवारच्या रात्री अंकुश तलावात बुडाल्याची शंका व्यक्त केली जात होती.  याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांची धडपड सुरू होती. बुधवारी दिवसभर तलावात शोध मोहीम राबविल्यानंतरही अंकुशचा शोध लागला नव्हता. त्यामुळे तो कुठेतरी निघून गेला असावा, तो परत येईल अशी आशा त्याच्या कुटुंबियांना होती. त्यांचे सर्व लक्ष अंकुशकडे लागले होते. अंकुश सुखरुप घरी परतेल अशी आशा त्याच्या कुटुंबीयांना होती. मात्र गुरूवारी ( 5 ऑक्टोबर ) त्याचा मृतदेह तलावात मिळाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना कळताच त्यांच्या दुःखाला पारा उरला नाही.  कुटुंबात सर्वात लहान होता अंकुशअंकुश हा त्यांच्या कुटुंबात सर्वात लहान होता. त्याच्या पेक्षा एक मोठा भाऊ आणि तीन बहिणी आहेत. अंकुशचा एक भाऊ कामासाठी बाहेर राहतो. अंकुश गोंदिया रेल्वे स्थानकावर चहा विक्रीचे काम करायचा.