शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यात वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:50 IST

तालुक्यातील म्हसगाव-कमरगाव नाल्यात एक विद्यार्थी वाहून गेल्याची घटना मंगळवारी (दि.२८) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूच्या मदतीने नाल्यात शोध मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देम्हसगाव-कमरगाव नाल्यावरील घटना : १८ तास चालली शोध मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील म्हसगाव-कमरगाव नाल्यात एक विद्यार्थी वाहून गेल्याची घटना मंगळवारी (दि.२८) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. वाहून गेलेल्या विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूच्या मदतीने नाल्यात शोध मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर बुधवारी (दि.२९) सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास म्हसगाववरुन अर्धा कि.मी.अंतरावर विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला. कार्तिक भोजराज रहांगडाले (१४) रा. कमरगाव असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार कार्तिक हा म्हसगाव येथील एस.एस.पी.डी हायस्कूलचा विद्यार्थी असून तो आठव्या वर्गात शिक्षक होता. मंगळवारी शाळा सुटल्यानंतर तो कमरगाव येथे घरी परत जात होता.दरम्यान म्हसगाव-कमरगाव नाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने त्याचा तोल गेल्याने तो नाल्यात वाहून गेला. जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे नदी नाले तुडंब भरुन वाहत आहे. नाल्यातील पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तो दूर वाहून गेला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी याची माहिती तहसीलदार व पोलीस विभागाला दिली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजतापासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूच्या मदतीने म्हसगाव-कमरगाव नाल्यात शोध मोहीम सुरू करण्यात आली. रात्री ८ वाजतापर्यंत शोधमोहिम सुरू होती. मात्र अंधार झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. त्यानंतर बुधवारी (दि.२९) सकाळी ६ वाजतापासून शोध मोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान घटनास्थळपासून अर्धा कि.मी.अंतरावर कार्तिकचा मृतदेह सापडला. शोध पथकाने कार्तिकचा मृतदेह नाल्याबाहेर काढल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. त्याच्या आई-वडीलांची स्थिती फार गंभीर झाली होती. मागील चौवीस तासापासून कार्तिकचा शोध न लागल्याने आपला मुलगा वाहून गेला नसावा, तो सुखरुप असा अशी आशा त्याच्या कुटुंबीयांना होती. दरम्यान कार्तिकचा मृतदेह सापडल्यानंतर ती आशा मावळली. कार्तिकचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार मनोज वाडे, नरेश वेदी उपस्थित होते.

टॅग्स :Deathमृत्यूfloodपूर