शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेहांनाही सोसाव्या लागतात यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 21:00 IST

जीवंतपणी झाले ते झाले मात्र मरणानंतर तरी शरिराचे हाल होऊ नये अशी सर्वांचीच अपेक्षा असते. मात्र येथील केटीएस रूग्णालयातील शवागारात (मर्च्युरी) मृतदेहांनाही यातना सोसाव्या लागत असल्याचे प्रकार घडत आहेत.

ठळक मुद्देशवागारातील फ्रीजर नादुरूस्त : व्यवस्थेच्या दृष्टीने प्रयत्नच नाहीत
<p>लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जीवंतपणी झाले ते झाले मात्र मरणानंतर तरी शरिराचे हाल होऊ नये अशी सर्वांचीच अपेक्षा असते. मात्र येथील केटीएस रूग्णालयातील शवागारात (मर्च्युरी) मृतदेहांनाही यातना सोसाव्या लागत असल्याचे प्रकार घडत आहेत. मृतदेहांना सुरक्षीत ठेवण्यासाठी असलेले फ्रीजर नादुरूस्त असल्यामुळे मृतदेहांचेही हाल होत आहेत. मात्र व्यवस्थेच्या नावावर केटीएस रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून काहीच प्रयत्न होत नसल्याचे दिसत आहे.गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आल्यापासून अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्यात भडके उडू लागले आहेत. रूग्णालयाच्या विषयांना घेऊन दोघांत तनातनी दिसते. केटीएस रूग्णालयातील शवागार व्यवस्थेतील सुधाराच्या नावावरही दोघांत वातावरण तापलेले आहे. अशात दुरूस्ती तर काही होत नाही उलट शवागारात येणाऱ्या मृतदेहांनाही यातना सोसाव्या लागत आहेत.मागील काही दिवसांपुर्वी नवेगावबांध येथील एक मृतदेह सुरक्षीत ठेवण्यासाठी येथील केटीएस रूग्णालयातील शवागारात पाठविण्यात आले होते. दोन दिवस ठेवल्यानंतर मात्र मृतदेह ठेवण्यासाठी आनाकानी केली जात असल्याची माहिती आहे. शवागारातील फ्रीजर नादुरूस्त असूनही तो मृतदेह येथेच ठेवण्यात आला. याबाबत वैद्यकीय महाविद्यालयातील प्रभारी अधिष्ठाता डॉ. वी.पी.रूखमोडे यांना विचारणा केली असता त्यांनी फ्रीजर नादुरूस्त असल्याचे सांगत याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक खरी माहिती देणार असे सांगीतले.माहितीनुसार, केटीएस रूग्णालयात मृतदेह सुरक्षीत ठेवण्यासाठी चार फ्रीजरची व्यवस्था आहे. मात्र चारही फ्रीजरचे तळ खराब झाल्याने रूग्णालयातील कर्मचारी मृतांच्या नातेवाईकांना बर्फाच्या लादीची व्यवस्था करण्यासाठी सांगतात. मात्र त्यानेही काहीच होत नसून फ्रीजरची व्यवस्था नसल्याने मृतदेहांचे हालच होत आहेत.जबाबदारीला घेऊन टोलवा-टोलवीशवागारच्या दुरूस्तीला घेऊन काय प्रयत्न केल जात आहेत याबाबत जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, हे त्यांचे काम नसल्याचे स्पष्ट सांगीतले. रूग्णालयाची पुर्ण व्यवस्था वैद्यकीय महाविद्यालयाकडे देण्यात आली आहे. यामुळे आता अधिष्ठाताच काही करू शकतील असे त्यांचे म्हणणे आहे. तर अधिष्ठाता डॉ. रूखमोडे यांनी रूग्णालयाचा कारभार जिल्हा शल्य चिकीत्सकांकडे असल्याने तेच याबाबत सांगू शकतील असे सांगीतले.