शिबिराच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. वाय. लंजे, तर व्यासपीठावर डाॅ. संजय चव्हाण, उपप्राचार्य डाॅ. एस. एस. भैरम, डाॅ. जे. बी. बघेले, डाॅ. प्रेरणा धनविज उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य साधून डाॅ. प्रेरणा धनविज यांनी मार्गदर्शनातून रक्तदानाचे महत्त्व विशद केले. प्राचार्य डाॅ. एन. वाय. लंजे यांनी समाजाचे ॠण फेडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे रक्तदान असून, रक्तदान करणे ही खरी समाजसेवा असल्याचे सांगितले. रक्तदान शिबिराप्रसंगी विनोद बंसोड, डाॅ. विजय रहांगडाले, प्रा. लोकेश कटरे व बाई गंगाबाई रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रा. लोकेश कटरे यांनी सूत्रसंचालन केले. रक्तदान शिबिराला यशस्वी करण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.
जगत महाविद्यालयात रक्तगट तपासणी, रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:27 IST