शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

ब्लॉकमुळे गोंदिया-नागपूर-गोंदिया रेल्वे प्रवास बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 21:32 IST

नागपूर रेल्वे मंडळांतर्गत येणाऱ्या काचेवानी, गंगाझरी व गोंदिया रेल्वे स्थानकांमध्ये आॅटोसिग्नलिंग व नॉन-इंटरलॉकिंगचे कार्य ११ ते १३ जूनपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे गोंदिया-नागपूर-गोंदिया रेल्वे प्रवास बाधित होणार आहे.

ठळक मुद्दे११ ते १३ जूनपर्यंत ब्लॉक : आॅटोसिंग्नलिंग व नॉन-इंटरलॉकिंगचे कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नागपूर रेल्वे मंडळांतर्गत येणाऱ्या काचेवानी, गंगाझरी व गोंदिया रेल्वे स्थानकांमध्ये आॅटोसिग्नलिंग व नॉन-इंटरलॉकिंगचे कार्य ११ ते १३ जूनपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे गोंदिया-नागपूर-गोंदिया रेल्वे प्रवास बाधित होणार आहे.दपूम मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत काचेवानी, गंगाझरी व गोंदिया रेल्वे स्थानकांत आॅटोसिग्नलिंग जोडण्यासाठी ११ जून रोजी सकाळी ८ वाजतापासून १३ जूनच्या सकाळी ८ वाजतापर्यंत म्हणजेच तीन दिवसांपर्यंत नॉन-इंटरलॉकिंगचे कार्य करण्यात येत आहे.नॉन इंटरलॉकिंगचे कार्य काचेवानी स्थानकात ११ जून रोजी सकाळी ८ वाजतापासून १२ जून रोजी रात्री २ वाजतापर्यंत तब्बल १८ तासांपर्यंत करण्यात येणार आहे. गंगाझरी स्थानकात ११ ते १२ जूनच्या रात्री २ वाजतापर्यंत व गोंदिया स्थानकात ४८ तासांपर्यंत ११ जूनच्या सकाळी ८ वाजतापासून १३ जूनच्या सकाळी ८ वाजतापर्यंत करण्यात येणार आहे.त्यामुळे काही प्रवासी गाड्या रद्द, काही गाड्यांना विविध स्थानकांत नियंत्रित तर काही गाड्यांना गंतव्य स्थळापूर्वीच समाप्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढणार आहे.रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्या११ व १२ जून रोजी (६८७१४/६८७१५) इतवारी-गोंदिया-इतवारी, (७८८१९/७८८२०) बल्लारशाह-गोंदिया-बल्लारशाह, (७८८२१/७८८२२) गोंदिया-कटंगी-गोंदिया, (७८८०१/७८८०२) गोंदिया-कटंगी-गोंदिया, (७८८०७/७८८०८) गोंदिया-वाराशिवनी-गोंदिया, (५८८१९/५८८२०) गोंदिया-समनापूर-गोंदिया व (६८७२९) डोंगरगड-गोंदिया मेमो या गाड्या रद्द राहणार आहेत.मार्ग परिवर्तन होणाऱ्या गाड्या११ जून रोजी चेन्नईवरून रवाना होणारी (१२८५२) चेन्नई-बिलासपूर एक्स्प्रेस बल्लारशाह-नागभीड-गोंदिया ऐवजी परिवर्तीत मार्ग बल्लारशाह-नागपूर-भंडारा रोड-गोंदिया वरून धावेल.गंतव्य स्थळापूर्वीच समाप्त-आंशिक रद्द गाड्या१० व ११ जून रोजी (१२१०५) मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस नागपूरमध्येच समाप्त होईल. या गाडीला ११ व १२ जून रोजी (१२१०६) गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस बनवून मुंबईसाठी रवाना करण्यात येईल.१० व ११ जून रोजी (११०३९) कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस नागपूरमध्येच समाप्त करण्यात येईल. १२ व १३ जून रोजी या गाडीला (११०४०) गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस बनवून कोल्हापूरसाठी नागपूरवरून रवाना करण्यात येईल.१० व ११ जून रोजी (१५२३१) बरोनी-गोंदिया एक्स्प्रेसला दुर्गमध्येच समाप्त करण्यात करून दुर्गवरूनच ११ व १२ जून रोजी (१५२३२) गोंदिया-बरोनी एक्स्प्रेस बनवून बरोनीसाठी रवाना करण्यात येईल.११ व १२ जून रोजी (१२०६९) रायगड-गोंदिया जनशताब्दी एक्स्प्रेस दुर्गमध्येच करून या गाडीला दुर्गवरून ११ व १२ जून रोजी (१२०७०) गोंदिया-रायगड जनशताब्दी एक्स्प्रेस बनवून रायगडसाठी रवाना करण्यात येईल.११ व १२ जून रोजी (६८७२१) रायपूर-डोंगरगड मेमोला दुर्गमध्येच समाप्त करून या गाडीला दुर्गवरून १२ व १३ जून रोजी (६८७२४) गोंदिया-रायपूर मेमो बनवून रायपूरसाठी सोडण्यात येईल.११ व १२ जून रोजी (५८११७) झारसुगुडा-गोंदिया पॅसेंजरला दुर्गमध्येच समाप्त करून दुर्गवरून १२ व १३ जून रोजी (५८११८) गोंदिया-झारसुगुडा पॅसेंजर बनवून झारसुगुडासाठी रवाना करण्यात येईल.