शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

रिक्त पदांनी मोडले आरोग्य सेवेचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 22:16 IST

गोंदिया जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ ला झाली व गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी-मोरगाव तालुक्याचा समावेश झाला. १९ वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतरही अर्जुनी-मोरगाव तालुकावासीयांना पुरेशी आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. तालुका अधिकारी कार्यालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रांना रिक्त पदांचे ग्रहण लागले असल्याने आरोग्य सवेचे कंबरडे मोडले आहे.

ठळक मुद्दे४० पदे भरलीच नाहीत : अधिकारी व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कइसापूर : गोंदिया जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ ला झाली व गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी-मोरगाव तालुक्याचा समावेश झाला. १९ वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतरही अर्जुनी-मोरगाव तालुकावासीयांना पुरेशी आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. तालुका अधिकारी कार्यालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रांना रिक्त पदांचे ग्रहण लागले असल्याने आरोग्य सवेचे कंबरडे मोडले आहे.तालुक्यात पंचायत समितीस्तरावर असलेल्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासह अन्य ६ प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण १४८ मंजूर पदापैकी १०८ पदे भरली असून ४० पदे रिक्त आहेत. परिणामी तालुक्यातील जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त झाले आहे. आरोग्य सेवेसारख्या ज्वलंत समस्येवर स्वत:ला राजकारणी समजून जनसेवेचा आव आणणारे लोकप्रतिनिधी रिक्त पदे भरण्यासाठी कोणते प्रयत्न केले असा संतप्त सवाल तालुकावासीयांनाकडून केला जात आहे.तालुक्यातील महालगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माताचे पद रिक्त आहे. आरोग्य सेवकाच्या ६ पदापैकी ३ पद रिक्त आहेत. तसेच कनिष्ठ सहायक व वाहन चालकाचे प्रत्येकी १ पद मंजूर असून ते रिक्त आहे. कोरंभीटोला केंद्रात औषध निर्माता २ पदे मंजूर असून १ पद रिक्त आहे. आरोग्य सहायक (स्त्री) १ पद मंजूर असून ते रिक्त आहे. आरोग्य सेविकांची १० पदे मंजूर असून ५ पदे रिक्त आहेत. तसेच आरोग्य सेवकांची ७ पदे मंजूर असून ३ पदे रिक्त आहेत. वाहन चालकाचे १ पद मंजूर असून तेही रिक्त आहे.चान्ना-बाक्टी येथील केंद्रात औषध निर्मातापद रिक्त आहे. आरोग्य सेविकेची ९ पैकी पदे रिक्त आहेत. आरोग्य सेवकांची ५ पैकी २ पदे रिक्त आहेत. कनिष्ठ सहायकाचे पद रिक्त असून परिचरांचे ५ पैकी १ पद रिक्त आहेत. वाहन चालकाचेही पद रिक्त आहे. गोठणाव केंद्रात औषध निर्माता व प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे पद रिक्त आहे. आरोग्य सेविकांच्या ५ पैकी १ पद रिक्त आहे. आरोग्य सेवकांचे एक पद रिक्त आहे. वाहन चालकाचेही पद रिक्त आहे. धाबेपवनी केंद्रात आरोग्य सेविकेची २ तर आरोग्य सेवकांचीही २ पदे रिक्त आहेत. परिचर वाहन चालकाचे प्रत्येकी १ पद रिक्त आहे. येथील केशोरी केंद्रात औषध निर्माता हे पद रिक्त आहे. आरोग्य सेविका, परिचर व वाहन चालकाचे प्रत्येकी १ पद रिक्त आहे.एकंदरीत अर्जुनी-मोरगाव तालुक्यात आरोग्य सेवेत औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहायक (स्त्री), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, कनिष्ठ सहायक, परिचर, वाहन-चालक या १४८ पदांची मंजुरी असून ४० पदे रिक्त असल्याने तालुक्यातील खेडेगावातील जनतेला आरोग्य सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी आहे.पालकमंत्र्यांच्या क्षेत्रातच अंधारराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत तालुकास्तरावर तालुका संनियंत्रण व सल्लागार समिती असते. या समितीच्या अध्यक्षपदी खुद्द सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले तर उपाध्यक्षपदी सभापती अरविंद शिवणकर, सचिव पदावर डॉ. विजय राऊत तर सदस्य म्हणून सर्व जि.प. सदस्य, सर्व पं.स.सदस्य आहेत. खुद्द बडोले हे अध्यक्षपदी असूनही तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्य