वाहतूक पोलीस गप्प : प्रवाश्यांना कोंबतात जनावरांसारखेआमगाव : सध्या नगरातील काळीपिवळी गाडीला सुगीचे दिवस आले आहेत. चालक सर्व नियम धाब्यावर ठेवून गाडी चालवित आहेत. मात्र ट्रॉफिक पोलीस किंवा गोंदिया आरटीओ साधी कारवाई करण्याकरिता धजावत नाही. केवळ वसुलीच्या नावावर सर्व गप्प बसले आहेत. यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.आमगाव ते गोंदिया दरम्यान जवळपास चौदा ते पंधरा काळीपिवळी चालतात. मात्र मागील काही दिवसांपासून काळीपिवळी मध्ये प्रवाश्यांना जनावरांसारखे कोंबले जाते. प्रवाशांना बसण्याकरिता जागा राहत नाही. एका सिटमध्ये पाच ते सहा समोर तिन मागे सात ते नऊ अशा प्रकारे प्रवाशी भरले जातात. ज्यांना जरूरीचे काम आहे ते मुकामार सहन करुन प्रवास करतात. यात अनेक काळीपिवळीचे चालक दारू पिऊन गाडी चालवितात. अनेकांकडे गाडी चालविण्याचा परवाना नाही. मात्र वाहतुक पोलीस किंवा वाहतूक नियंत्रक यांच्यावर कोणतीच कारवाई करीत नाही. हे सर्व आमगाव-गोंदिया आमगाव-कामठा व आमगाव-देवरी मार्गावर चालू आहे. मात्र सर्व गाड्यांचे हप्ते सुरू असल्याने कारवाई करण्याची कोणाचीच हिंमत होत नाही. त्यामुळे हप्ता चालक बिनधास्त अशा प्रकारे गाडी चालवितात. यामुळे प्रवाशांना आपला जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागतो. पोलीस व वाहतूक नियंत्रकांना हफ्ता मिळतो याकरिता कुणीही कारवाई करीत नाही. दारू पिऊन गाडी चालविणे, परवाना नसताना किंवा मोठ्या प्रमाणात नियमबाह्य भर्ती करून गाडी ने-आण करणे धोक्याचे व नियमबाह्य आहे. नियम धाब्यावर ठेवून हा प्रकार राजरोषपणे सुरू आहे. हा प्रकार बंद करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
व्यसन करून चालवितात काळीपिवळी
By admin | Updated: July 16, 2015 01:48 IST