शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

सर्वाधिक ग्राम पंचायतींवर भाजपाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:53 PM

जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी निवडणूक पार पडली. तर मंगळवारी (दि.१७) मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले.

ठळक मुद्देआमगाव, सडक -अर्जुनीत राष्टÑवादी : सरपंच पदासाठी झाली चुरस, समर्थकांचा जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतीसाठी सोमवारी निवडणूक पार पडली. तर मंगळवारी (दि.१७) मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. यात ३४१ ग्रामपंचायतींपैकी ६० ते ६५ टक्के ग्रामपंचायतींवर भाजपा समर्थीत उमेदवार विजयी झाले. मतदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच्या बाजुने कौल दिल्याने दोन तालुके वगळता इतर तालुक्यात भाजपाने मुसंडी मारल्याचे चित्र आहे.निवडणूक विभागाने जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला होता. यापैकी तीन ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली. तर तीन ग्रामपंचायतीची निवडणूक गावकºयांनी आक्षेप घेतल्याने निवडणूक विभागाने रद्द केली. त्यामुळे सोमवारी जिल्ह्यातील ३४१ ग्रामपंचायतीसाठी मतदान घेण्यात आले.या निवडणुकीत ८५.५८ टक्के मतदान झाले. यात जिल्ह्यातील एकूण ३ लाख ८२ हजार ८०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. १ लाख ९३ हजार ७२ महिला मतदारांनी तर १ लाख ८९ हजार ९०९ पुरूष मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. ३४७ सरपंचपदासाठी एकूण १ हजार ५८ उमेदवार तर ३ हजार २३ सदस्य पदासाठी ५ हजार ८१८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी ८ सरपंच व ३१३ सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे उर्वरित पदासाठी निवडणूक घेण्यात आली. मंगळवारी सकाळी ८ वाजतापासूनच सर्वच तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात मतमोजणीची करण्यात आली. काही ठिकाणी सुरूवातीपासूनच भाजपा समर्थीत उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र होते. यंदाच्या निवडणुकीपासून सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने सर्वांचे लक्ष सरपंच पदाच्या उमेदवाराकडे लागले होते.निकाल ऐकण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी केली होती. जसे जसे निकाल जाहीर होत होते. तस तसा समर्थकांचा जल्लोष होत होता. ही निवडणूक कुठल्या पक्ष्याच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी सर्व राजकीय पक्ष पडद्याआड उमेदवारांना समर्थन देतात.दरम्यान वाढती महागाई, नोटबंदी, दुष्काळ, कर्जमाफी या मुद्दावरुन ग्रामीण भागात सरकार विरोध रोष असल्याची चर्चा होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा भाजपाच्या बाजुने कौल दिल्याने हे मुद्दे गौण ठरले.सडक-अर्जुनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व अर्जुनी-मोरगाव येथे १८ सरपंच पदाचे उमेदवार निवडून आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर चंद्रिकापुरे यांनी केला आहे. दरम्यान गोंदिया तालुक्यातील विजयी उमेदवारांच्या संख्येवरुन भाजप व काँग्रेसने सर्वाधिक उमेदवार निवडून आल्याचा दावा केला.काही ठिकाणी मतमोजणीला उशिराने सुरुवातदेवरी मतदार संघातील केशोरी येथील मतदान यंत्रामध्ये बिघाड आल्याने मतमोजणीची प्रक्रिया काहीवेळ बंद होती. त्यामुळे मतमोजणीे विलंब झाल्याने काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मशीनमधील बिघाड दुरूस्त करुन मतमोजणीला पुन्हा सुरूवात करण्यात आली.सरकारच्या अकार्यक्षमतेचा पराभवग्रामपंचायत निवडणुकीतील विजय हा सर्व कार्यकर्त्यांचा आहे. सरकारच्या अकार्यक्षमतेप्रती ग्रामीण जनतेची संप्तत प्रतिक्रीया आहे. सरकार राज्यातील शेतकरी, लघु उद्योग, व्यापारी व जनतेसाठी सकारात्मक निर्णय घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाºया भाजपाचा सरकारचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. वाढती महागाई, पेट्रोलचे वाढते दर, शेत मालाला योग्य भाव नाही त्यामुळे जनता त्रस्त झाली. त्यामुळेच मतदारांनी काँग्रेसच्या बाजुने कौल दिला आहे.- आमदार गोपालदास अग्रवालकार्यकर्ता व जनतेचा विजयग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय हा कार्यकर्ता व जनतेचा विजय आहे. प्रधानंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर व त्यांनी केलेल्या कामांवर जनतेने विश्वास ठेवून भापजला विजयी केले. विरोधकांच्या खोट्या आश्वासनांना जनता ओळखू लागली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचाच उमेदवार निवडून येणार.-विनोद अग्रवाल, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष