शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने केवळ लोकहिताच्या योजनांचे नामांतरण केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:23 IST

केंद्र आणि राज्यात आघाडी सरकारच्या कार्यकाळात विविध लोक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. यामुळे लोककल्याणाची कामे सुरू होती. मात्र केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या भाजप सरकारने मागील चार वर्षांत विविध कल्याणकारी योजनांची नावे बदलविण्यापलिकडे काहीच केले नाही.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : गोंदिया तालुक्यात प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र आणि राज्यात आघाडी सरकारच्या कार्यकाळात विविध लोक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. यामुळे लोककल्याणाची कामे सुरू होती. मात्र केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या भाजप सरकारने मागील चार वर्षांत विविध कल्याणकारी योजनांची नावे बदलविण्यापलिकडे काहीच केले नाही. सत्तारुढ सरकार केवळ योजनांचे नामाकरण करणारे सरकार असल्याची टीका आ. गोपालदास अग्रवाल यांनी केली.भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा.पिरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ गोंदिया तालुक्यातील दवणीवाडा येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी माजी खा. नाना पटोले, आ.प्रकाश गजभिये, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, महिला बाल कल्याण सभापती लता दोनोडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चुन्नीभाऊ बेंद्रे, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक चौधरी, राकेश ठाकूर, शकील मन्सूरी, अपूर्व अग्रवाल, नानू मुदलियार, सतीश देशमुख उपस्थित होते.अग्रवाल म्हणाले, सत्तारुढ सरकारने राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव महात्मा फुले योजना केले मात्र योजनेच्या लाभापासून लाभार्थ्यांना दूर ठेवण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अद्यापही कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसून हजारो शेतकरी अजुनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्याच्या नावावर पेट्रोल व डिझेलवर कृषी कर लावला. प्रत्यक्षात या निधीचा वापर शेतकऱ्यांसाठी केला जात नसल्याचे चित्र आहे. सत्तारुढ सरकारची ध्येय धोरणे ही जनहीत विरोधी असून अशा सरकारला धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे आ.अग्रवाल यांनी सांगितले. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा.पिरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांना साथ देण्याचे आवाहन केले.पटोले म्हणाले, भाजप सरकारच्या काळात प्रत्येक नागरिक लाईनमध्ये उभा आहे. कधी नोटबंदी तर कधी पीक विमा तर कधी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना लाईनमध्ये उभे राहावे लागत आहे. जनधन योजनेतंर्गत नागरिकांच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने जनधन खात्यातून खातेदारांना पैसे काढण्याकरीता प्रतिबंध लावले आहे. महागाई आटोक्यात आणण्याऐवजी विविध कर लावून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढविल्या.त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून अशा खोटारट्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची हिच योग्य वेळ आहे. यासाठी कुकडे यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल