शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
3
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
4
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
5
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
6
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
7
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
8
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
9
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
10
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
11
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
12
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
13
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
14
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
15
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
16
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
17
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
18
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
19
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा
20
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!

भाजप सरकारने जनहितार्थ योजना बंद केल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:41 IST

विकास आणि जनहितार्थ योजना राबविण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने प्रत्यक्षात याविरुध्द काम केले आहे. गोरगरीब व सर्वसामान्यांच्या हितार्थ राबविल्या जात असलेल्या जनहितार्थ योजना भाजप सरकारने बंद जनतेचा विश्वासघात केला.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : गोरेगाव तालुक्यात ठिकठिकाणी प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विकास आणि जनहितार्थ योजना राबविण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने प्रत्यक्षात याविरुध्द काम केले आहे. गोरगरीब व सर्वसामान्यांच्या हितार्थ राबविल्या जात असलेल्या जनहितार्थ योजना भाजप सरकारने बंद जनतेचा विश्वासघात केला. गोसेखुर्दसारख्या महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्पाचा निधी रोखून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केल्याची टिका खा.प्रफुल्ल पटेल यांनी केली.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे अधिकृत उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ मंगळवारी (दि.२) गोरेगाव तालुक्यातील कालीमाटी, हिराटोला, चोपा, मुंडीपार, बोटे, कुºहाडी व कवलेवाडा येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते.या वेळी उमेदवार नाना पंचबुध्दे, माजी आ.दिलीप बन्सोड, के.आर.शेंडे, पी.जी.कटरे, झामसिंग बघेले, मनोहर चंद्रिकापुरे, जगदीश येरोला, ज्योती वालदे, कैलाश डोंगरे, राजू भेलावे, ललिता बहेकार, डेमेंद्र रहांगडाले, केवल रहांगडाले, लक्ष्मण चंद्रिकापुरे उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल म्हणाले, भाजप सरकारने अनेक महत्त्वपूर्ण योजना बंद करुन विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचे काम केले. मागील दोन वर्षांपासून मनरेगाच्या मजुरांना वेतन मिळाले नाही, इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मानधन व ओबीसी विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. तर नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण समजली जाणारी बीआरजीएफ योजना , राष्ट्रीय आरोग्य अभियानासारख्या योजनेत कपात करुन त्या योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला. सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र अद्यापही या योजनेचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे ही योजना सुध्दा जुमलेबाज निघाली. तर धानाला लागवड खर्चावर आधारित हमीभाव देण्याची घोषणा केली होती पण याची सुध्दा पुर्तता सरकारने केली नाही.निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मागील चार वर्षांत यंदा प्रथमच धानाला ५०० रुपये बोनस जाहीर केले. मात्र याचा सुध्दा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळाला नाही. जीएसटी कर प्रणाली लागू करुन लहान उद्योग बंद पाडून रोजगार हिरावण्याचे काम केले. तर पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरची दरवाढ करुन सर्वसामान्यांना जीणे मुशीकल केले आहे. त्यामुळे अशा विश्वासघाती आणि जनतेच्या अपेक्षा भंग करणाऱ्या सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले. तसेच गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्यास सांगितले. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा सभेला संबोधित केले.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल