शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भरवस्तीत रानगव्याचा धुमाकुळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 22:33 IST

मंगळवारी सकाळच्या सुमारास सालईटोला रस्त्याच्या दिशेने शेंडा गावाकडे एक रानगवा येत असल्याचे काही गावकऱ्यांनी बघितले. एवढ्यातच कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला.रानगवा ईकडे-तिकडे न भटकता सरळ डांबरीकरण मार्गाने गावात प्रवेश करुन अनेक लोकांच्या घरात शिरला.त्यामुळे गावकऱ्यांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्देशेंडा येथील घटना : गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास एका रानगव्याने धुमाकुळ घातल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रानगव्याने काही नागरिकांच्या घरात घुसून धुमाकुळ घातला मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी अथवा ईजा झाली नाही.प्राप्त माहितीनुसार मंगळवारी सकाळच्या सुमारास सालईटोला रस्त्याच्या दिशेने शेंडा गावाकडे एक रानगवा येत असल्याचे काही गावकऱ्यांनी बघितले. एवढ्यातच कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केला.रानगवा ईकडे-तिकडे न भटकता सरळ डांबरीकरण मार्गाने गावात प्रवेश करुन अनेक लोकांच्या घरात शिरला.त्यामुळे गावकऱ्यांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळताच शेंडा बिटचे वन क्षेत्र सहाय्यक शैलेश पारधी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. गावात धुमाकुळ घालणाऱ्या रानगव्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केले. अखेर तीन ते चार तासाच्या परिश्रमानंतर रानगव्याला पकडण्यात वन विभागाच्या कर्मचाºयांना यश आले. हा सर्व प्रकार बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. शेंडा गावाचा परिसर जंगलव्याप्त असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात अनेकदा गावाकडे धाव घेतात. मात्र रानगवा भरवस्तीत शिरल्याची घटना पहिल्यांदाच घडली.सदर रानगव्याला जंगलाच्या दिशेने पळविण्यासाठी वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक शैलेश पारधी,वनरक्षक व्ही.पी.बडोले, एन.एस.पातोळे, डी.डी.माहुरे, वनमजूर एन.आर.मेंढे, वाय.एस.ईळपाते यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :forest departmentवनविभाग