शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बिरसी प्रकल्पग्रस्तांना मिळणार मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:14 IST

तालुक्यातील बिरसी येथील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेज अतंर्गत आर्थिक मोबदला पंधरा दिवसात वाटप केला जाणार आहे. यासाठी २१ कोटी रुपयांचा निधी उपविभागीय कार्यालयाला प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्दे२१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध : १५ दिवसात होणार वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील बिरसी येथील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेज अतंर्गत आर्थिक मोबदला पंधरा दिवसात वाटप केला जाणार आहे. यासाठी २१ कोटी रुपयांचा निधी उपविभागीय कार्यालयाला प्राप्त झाला आहे.बिरसी येथील विमानतळामुळे प्रकल्पबाधीेत झालेल्या प्रकल्पग्रस्तांना मागील आठ दहा वर्षांपासून भारतीय विमान प्राधिकरणाकडून आर्थिक मोबदला मिळाला नव्हता. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आर्थिक संकटात सापडले होते. विमान प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाकडे वांरवार पाठपुरावा करुन सुध्दा प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. याची दखल घेत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेज अंतर्गत निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत होते. यासाठी त्यांनी भारतीय विमान प्राधिकरण आणि संबंधित विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेवून प्रकल्पग्रस्तांना निधीे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले होते. त्याचीच दखल घेत प्राधिकरणाने २१ कोटी रुपयांचा निधी उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्याकडे उपलब्ध करुन दिला आहे. प्राप्त झालेल्या निधीचे शेतकºयांना त्वरीत वाटप सुरू करण्याचे निर्देश आ.अग्रवाल यांनी दिले आहे. उपविभागीय अधिकारी वालस्कर यांनी सांगितले की प्रकल्पग्रस्तांची यादी प्रकाशीत करुन त्यावर आक्षेप मागविले होते. पुढील आठवड्यात अंतीम यादी प्रकाशीत करुन प्रकल्पग्रस्तांना निधीचे वाटप करण्यात येणार असल्याचे वालस्कर यांनी सांगितले. आ.अग्रवाल यांच्या प्रयत्नाने प्रकल्पग्रस्तांसाठी निधी उपलब्ध झाल्याने मागील आठ दहा वर्षांपासून प्रलबिंत असलेला प्रश्न मार्गी लागला आहे. विशेष म्हणजे आ.अग्रवाल यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री अशोक गजपती राजू यांची भेट घेवून प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेज अतंर्गत निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा २१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला.