शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिरसी विमानतळावरील प्रवासी विमानसेवा ठरली औट घटकेची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2022 20:35 IST

गोंदिया-इंदोर-हैदराबाद या विमानसेवेला सुरुवात करण्यात  आली. त्याला प्रवाशांचासुद्धा चांगला प्रतिसाद मिळत होता.  प्लाय बिग कंपनीने ऑक्टोबरपर्यंत या विमानतळावरून विमान  सेवा सुरू ठेवण्याचा करार केला. पण पाच महिन्यांच्या कालावधीतच ९ ऑगस्टपासून देखभाल दुरुस्तीच्या नावावर प्रवासी  विमान वाहतूक सेवा बंद केली. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील प्रवाशांसाठी ही सेवा औट घटकेची ठरली. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील बिरसी विमानतळावरून जवळपास सात ते आठ वर्षांच्या कालावधीनंतर उड्डाण प्रकल्पांतर्गत १३ मार्च २०२२ पासून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ झाला होता. मात्र या विमानतळावरून ही सेवा चालविण्याचे कंत्राट घेतलेल्या फ्लाय बिग कंपनीने देखभाल दुरुस्तीच्या नावावर करार संपण्यापूर्वीच आपला गाशा गुंडाळला. त्यामुळे या विमानतळावरून सुरू झालेली प्रवासी विमान वाहतूक सेवा ही औट घटकेची ठरली. गोंदिया तालुक्यातील बिरसी येथे तत्कालीन केंद्रीय विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय दर्जाचे  विमानतळ उभारले होते. तसेच या ठिकाणी पायलट प्रशिक्षण केंद्र सुरूसुद्धा करण्यात आले. या विमानतळावरून प्रवासी  विमान वाहतूक सेवा सुरू करण्याची बाब मागील चार-पाच वर्षांपासून विचाराधीन होती. त्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाच्या उड्डाण प्रकल्पांतर्गत विमान सेवा सुरू करण्यासाठी खा. सुनील मेंढे यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यशसुद्धा  आले. नोएडा येथील फ्लाय बिग या खासगी विमान कंपनीने बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा करण्याचे कंत्राट  घेतले. १३ मार्चपासून २०२२ या विमानसेवेला प्रारंभ करण्यात आला. गोंदिया-इंदोर-हैदराबाद या विमानसेवेला सुरुवात करण्यात  आली. त्याला प्रवाशांचासुद्धा चांगला प्रतिसाद मिळत होता. प्लाय बिग कंपनीने ऑक्टोबरपर्यंत या विमानतळावरून विमान  सेवा सुरू ठेवण्याचा करार केला. पण पाच महिन्यांच्या कालावधीतच ९ ऑगस्टपासून देखभाल दुरुस्तीच्या नावावर प्रवासी  विमान वाहतूक सेवा बंद केली. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील प्रवाशांसाठी ही सेवा औट घटकेची ठरली. 

प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज - बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे. या विमानतळावरून प्रवासी व कार्गो सेवा सुरू करण्याला वाव आहे. मध्य प्रदेश  आणि छत्तीसगड राज्य लागून आहे. शिवाय गोंदिया हे हावडा-मुंबई मार्गावरील एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवेला चांगला वाव होता. पुन्हा ही सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती  आणि केंद्रात वजनाची गरज आहे.

सेवा बंद करण्यासाठी देखभाल दुरुस्तीचा बहाणा

- फ्लाय बिग कंपनीने ९ ते २१ ऑगस्ट दरम्यान विमानांच्या देखभाल दुरुस्तीचे कारण देऊन पुढे सेवा बंद राहणार असल्याचे सांगितले. मात्र २१ ऑगस्टनंतरही फ्लाय बिगने विमानसेवा सुरू केली नाही. विशेष म्हणजे विमानतळावरील त्यांच्या कार्यालयाचे साहित्यसुद्धा घेऊन गेले.

विमानतळ प्राधिकरणाचे २ लाख रुपये शिल्लक

- प्लाय बिग कंपनी विमानतळाच्या रनवेपर्यंत सामान पोहोचविण्यासाठी मार्च महिन्यापासून एक ट्रॅक्टर भाड्याने घेतले होते. या ट्रॅक्टरचा किराया जवळपास २ लाख रुपये शिल्लक असून तो अद्यापही फ्लाय बिग कंपनीने बिरसी विमानतळ प्राधिकरणाने  जमा केला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

प्रवासी विमानसेवा सुरू होण्याची आशा धूसर - बिरसी विमानतळावर नाइट लँडिंगसाठी आवश्यक असलेली एएलएस (ऑटोमॅटिक लँडिंग सिस्टीम) ही कंपनीने काढून नेली  आहे. त्यामुळे बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू होण्याची शक्यता आता फार कमी असल्याचे बोलले  जाते.  

 

टॅग्स :Airportविमानतळairplaneविमान