चिरेखनी फाट्यावरील घटना : दोन ठार, एक जखमी तिरोडा : खैरलांजी मार्गावर असलेल्या चिरेखनी फाट्यावर दोन दुचाकींची आपसांत अमोरासमोर धडक झाली. शनिवारी (दि.१८) सकाळी १०.३० वाजता दरम्यान घडलेल्या या अपघातात दोन जण ठार झाले असून एक गंभीर जखमी झाला आहे. मृतांचे नाव प्रभुदास नारायण ठाकरे (४०,रा. बिहिरीया) व छोटू भगत (३७, रा.सिल्ली) असे आहे. हिरो होंडा पॅशन प्रो दुचाकी एमएच३५/ एक्स ९७४७ वरून प्रभूदास व छोटू भरधाव वेगात जात असताना चिरेखनी फाट्यावर समोरून येणाऱ्या सोहनलाल बिसेन (३०,रा.चिरेखनी) यांच्या होंडा शाईन दुचाकी एमएच ३५/व्ही ४७०७ सोबत त्यांची अमोरासमोर जबर धडक झाली. यात प्रभुदास व छोटू जखमी होऊन मरण पावले. तर सोहनलाल हा गंभीर जखमी असून त्याला उपचाराकरिता नागपूरला पाठविण्यात आले आहे. तिरोडा पोलिसांत प्रकरणाची नोंद घेण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी देवीदास ईलमकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संजय देशमुख व हवालदार गायधने तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
दुचाकींची आपसांत धडक
By admin | Updated: July 19, 2015 01:31 IST