शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी राबविली बीजगोळे संकलन मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 21:46 IST

आमगाव तालुक्यातील ग्राम बिरसी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्ग ५ वीच्या विद्यार्थ्यांनी कार्यानुभव या विषयांतर्गत पाच हजार बीजगोळे संकलनाची मोहीम राबविली. फिरते शाळेतील पक्षीमित्र शिक्षक जैपाल ठाकूर यांच्या संकल्पनेतून ‘बीजगोळे संकलन’ हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

ठळक मुद्दे पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार : पावसाळ्यात टाकले जाणार बीजगोळे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमगाव तालुक्यातील ग्राम बिरसी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वर्ग ५ वीच्या विद्यार्थ्यांनी कार्यानुभव या विषयांतर्गत पाच हजार बीजगोळे संकलनाची मोहीम राबविली. फिरते शाळेतील पक्षीमित्र शिक्षक जैपाल ठाकूर यांच्या संकल्पनेतून ‘बीजगोळे संकलन’ हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.बिरसी शाळेच्या विद्यार्थ्यांनी करंजी, चिच, गुंजा, पळस, बांभूळ, कडूनिंब व इतर झाडाचे बीज संकलन केले. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी माती आणून बी टाकले व उन्हात वाळवून ते लाडू शाळेत घेऊन आले. सर्वात जास्त कोण लाडू बनवेल? याविषयी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा झाली. आणि यातूनच बीजगोळ््यांची संख्या वाढली अन वेगळाच आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चाललाय. आपण वेळीच साधव झालो नाही तर आपल्याला प्रत्येक संकटाला तोंड दयावे लागेल. वृक्षकटाई, वाढते प्रदुषण यामुळे पर्यावरणाचे असंतुलन होऊन पूर, वादळे, भूकंप, वाढते तापमान व अनारोग्य यासारख्या समस्या आवासून उभ्या होत आहेत. अशावेळी ‘झाडे लावा- माणूस व सृष्टी वाचवा’ जर यशस्वी करायचे असेल तर शालेय जीवनातच विद्यार्थीदशेत योग्य संस्कार टिकविले तर ते चिरकाल टिकतील आणि झाडाचे महत्व व पर्यावरणाचे महत्व विद्यार्थ्यांना समजेल.आपण पर्यावरणातही काय करु शकतो? आपल्या काहीतरी देणं आहे. या भावनेने विद्यार्थी प्रेरित होवून विद्यार्थ्यांनी बीजगोळे संकलन केले. येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीजगोळे योग्य ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा, कालव्याच्या काठावर टाकले जाणार आहे. अशा प्रकारच्या उपक्रमाचा कोणताही खर्च न होता पर्यावरणाच्या रक्षणासाठी निश्चितच हातभार लागेल असा विश्वास शाळेचे मुख्याध्यापक एल.यू.खोब्रागडे यांनी व्यक्त केला. सदर उपक्रमम यशस्वी करण्यासाठी विकास लंजे, वर्षा बावनथडे व सोना रहांगडाले यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :Studentविद्यार्थी