भीमा कोरेगाव शौर्य दिन गोंदिया : शहरातील भीमनगर मैदानात समता सैनिक दलच्यावतीने भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा करण्यात आला. समता सैनिक दलचे शहर प्रमुख राजहंस चौरे यांच्या मार्गदर्शनात कमांडर चाहत मेश्राम यांनी आपल्या सैनिकांसोबत ‘जयभीम सल्यूट’ केला. या कार्यक्रमात शहरातील सुमारे ६० सैनिक उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमितेसमोर मोमबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करून बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले समता सैनिक दलचे शहर संघटक महेंद्र कठाणे यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमात विदर्भ कार्यकारिणी सदस्य पंचशील बौद्ध, महेंद्र टेंभेकर, किशोर खोब्रागडे, राशि सूर्यवंशी, ऋषभ सूर्यवंशी, पल्लवी राहुलकर, खुशबू गजभिये, अजिंक्य उके, रामटेककर मॅडम, आदर्श रामटेके, नेहा उके, निकीता मेश्राम, खुशी मेश्राम, नंदिनी भालाधरे, अस्मिता बन्सोड, राऊत, रियल वालदे, छाया क्षीरसागर आदि सैनिक प्रामुख्याने उपस्थित होते. आभार शहर प्रमुख चौरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी कमांडर मेश्राम व राशी सूर्यवंशी यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
भीमा कोरेगाव शौर्य दिन
By admin | Updated: January 8, 2017 00:28 IST