शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
4
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
5
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
6
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
7
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
8
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
9
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
10
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
11
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
12
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
13
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
14
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
15
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
16
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
17
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
18
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
19
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
20
कोल्हापुरातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

सुनील मेंढे झाले भंडारा-गोंदियाचे खासदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 23:41 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ११ एप्रिलला पार पडल्यानंतर तब्बल ४२ दिवसांनी गुरूवारी (दि.२३) मतमोजणी घेण्यात आली.त्यामुळे १७ व्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाचा खासदार कोण होणार याकडे मतदारांचे लक्ष लागले होते. भाजपचे सुनील मेंढे यांनी ६ लाख ५० हजार २४३ मते घेत विजय संपादित केला.

ठळक मुद्देभंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक : मेंढे यांना ५२.२३ टक्के तर नाना पंचबुद्धे यांना ३६.३८ टक्के मते

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ११ एप्रिलला पार पडल्यानंतर तब्बल ४२ दिवसांनी गुरूवारी (दि.२३) मतमोजणी घेण्यात आली.त्यामुळे १७ व्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाचा खासदार कोण होणार याकडे मतदारांचे लक्ष लागले होते. भाजपचे सुनील मेंढे यांनी ६ लाख ५० हजार २४३ मते घेत विजय संपादित केला. राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांना ४ लाख ५२ हजार ८४९ मते या निवडणुकीत मिळाले असून सुनील मेंढे यांचा १ लाख ९७ हजार ३९४ मताधिक्यांनी विजय झाला. त्यामुळे या मतदारसंघाचे खासदार सुनील मेंढे ठरले.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गुरूवारी सकाळी ८ वाजता सुरू होवून मध्यरात्री संपली. तब्बल ३३ फेऱ्या मतमोजणीच्या पार पडल्या.प्रत्येक फेरीत भाजपाचे सुनील मेंढे आघाडी घेत असल्याने दुपारीच विजयाचे चित्र स्पष्ट झाले होते. मात्र अंतीम निकाल रात्री २.१५ मिनिटानी घोषित झाला. त्यानंतर विजयी उमेदवार भाजपाचे सुनील मेंढे यांना जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी निवडणूक निरीक्षक पार्थ सारथी मिश्रा, उपजिल्हाधिकारी प्रमोद भुसारी उपस्थित होते.या निवडणुकीत भाजपाचे सुनील मेंढे यांना ६ लाख ५० हजार २४३, राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांना ४ लाख ५२ हजार ८४९, बसपाच्या डॉ. विजया नंदुरकर यांना ५२ हजार ६५९, वंचित बहुजन आघाडीचे कारू नान्हे यांना ४५ हजार ८४२, पिपल्स पार्टी आॅफ इंडिया डेमाक्रॉटीकचे भीमराव बोरकर यांना १ हजार ४६८, भारतीय शक्तीचेतना पार्टीचे भोजराज मरस्कोल्हे यांना ९०५ मते तर अपक्ष निलेश कलचुरी यांना ५४७, प्रमोद गजभिये, ९८०, मिलिंदकुमार जैस्वाल २ हजार ६९९, देविदास लांजेवार १ हजार ५४९, राजेंद्र पटले १३ हजार १४५, डॉ. सुनील चवळे १ हजार ५०७, सुमीत पांडे यांना ३ हजार ३१, सुहास फुंडे यांना ६ हजार ९८३ मते मिळाली. या निवडणुकीत अपक्षांमध्ये सर्वाधिक राजेंद्र पटले यांना १३ हजार १४५ मते मिळाली. १४ उमेदवारांमध्ये आठ अपक्ष उमेदवारांनी आपले भाग्य अजमावले. या आठ अपक्ष उमेदवारांच्या एकूण मतांची बेरीज ३४ हजार ४४४ होते.विशेष म्हणजे सुनील मेंढे व नाना पंचबुद्धे वगळता सर्व १२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात भाजपचे सुनील मेंढे यांना ५२.२३ टक्के तर राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांना ३६.३८ टक्के मते मिळाली होती. गत २०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार नाना पटोले यांना ५०.६२ टक्के तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना ३८.१६ टक्के मते मिळाली होती.सहाही मतदारसंघात सुनील मेंढे यांची मुसंडीभाजपाचे उमेदवार सुनील मेंढे यांनी सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली. सर्वाधिक आघाडी भंडारा विधानसभेत मिळाली. मेंढे यांना १ लाख ३२ हजार ९ मते तर पंचबुद्धे यांना ७७ हजार ४५६ मते मिळाली. भंडारा विधानसभेत ५४ हजार ५५३ मतांची आघाडी मिळाली. भाजपाला तुमसर विधानसभा क्षेत्रात ३६ हजार ६५७, साकोलीत ३२ हजार ४३६, अर्जुनी मोरगाव १५ हजार ९९, तिरोडा २० हजार ७०७, गोंदिया ३८ हजार ४१६ मतांची आघाडी मिळाली.दहा हजारावर मतदारांची उमेदवारांना नापसंतीलोकसभा निवडणुकीत १० हजार ५२४ मतदारांना १४ पैकी कोणताही उमेदवार पसंत नसल्याने त्यांनी नोटाचे बटन दाबले. त्यात ई बॅलेटचे दहा आणि पोस्टल बॅलेटचे १०२ मतदार आहेत.नाना पंचबुद्धे यांना सर्वाधिक पोस्टल मतेलोकसभा निवडणुकीत पोस्टल बॅलेटमध्ये मात्र मतदारांनी राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे यांना पसंती दिली. त्यात पंचबुद्धे यांना ४ हजार ३५८, मेंढे यांना ३ हजार ७१ मते मिळाली. ९ हजार १३४ मतदारांनी पोस्टल बॅलेटने मतदान केले. त्यापैकी १०२ मतदारांनी नोटाला मत दिले. तर १ हजार १७३ मते अवैध ठरली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल