शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लिंकिंगवर राहणार आता भरारी पथकांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 05:00 IST

खरीप हंगामात युरिया खताची सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे याच संधीचा फायदा काही खतविक्रेत्या कंपन्या घेत आहे. मागील आठवड्यात आरसीएफ आणि नर्मदा कंपनीकडून युरिया खतासह संयुक्त खताची उचल करण्याची सक्ती कृषी केंद्र संचालकावर केली जात होती. त्यामुळे कृषी केंद्र संचालकांनी या विरोधात कृषी विभागाकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर आरसीएफ कंपनीला विक्री बंदचे आदेश दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रासायनिक खतावरील लिंकिंगचा प्रकार बंद करण्याच्या सूचना केंद्र सरकारने केल्यानंतर काही खतविक्रेत्या कंपन्याकडून लिंकिंग केली जात आहे. याचाच भुर्दंड शेतकरी आणि कृषी केंद्र संचालक या दोघांनाही बसत आहे. लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित करताच कृषी विभागाची यंत्रणा कामाला लागली असून, खतविक्रेत्यांना कंपन्यांना सुद्धा तंबी दिल्याची माहिती आहे. खरीप हंगामात युरिया खताची सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे याच संधीचा फायदा काही खतविक्रेत्या कंपन्या घेत आहे. मागील आठवड्यात आरसीएफ आणि नर्मदा कंपनीकडून युरिया खतासह संयुक्त खताची उचल करण्याची सक्ती कृषी केंद्र संचालकावर केली जात होती. त्यामुळे कृषी केंद्र संचालकांनी या विरोधात कृषी विभागाकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर आरसीएफ कंपनीला विक्री बंदचे आदेश दिले होते. त्यानंतर हे आदेश रिलीज करण्यात आले. तसेच कुठल्याही खतावर लिंकिंग न करण्याचा सूृचना कंपनीला देण्यात आल्या होत्या. मात्र यानंतरही लिंकिंगचा प्रकार सुरूच होता. लोकमतने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केल्यानंतर कृषी विभागाने गठित केलेल्या भरारी पथकाने यावर नजर ठेवण्याच्या सूचना केल्या. तसेच खतविक्रेत्या कंपन्यांना सुद्धा लिकिंग न करण्याच्या सूचना केल्या. कंपन्याकडून लिंकिंग सुरू असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत होता. एक बॅग युरिया घेण्यासाठी त्यांना ११५० रुपयांच्या संयुक्त खताची खरेदी करावी लागत होते. त्यामुळे गरज नसताना शेतकऱ्यांना हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. 

कृषी केंद्राची तपासणी - कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खतावरील लिंकिंगच्या अनुषंगाने गुरुवारी (दि.१९) शहरातील काही कृषी केंद्राची पाहणी करून त्यांच्याकडून माहिती घेतली. तसेच कंपन्याकडून लिंकिंगसाठी जबरदस्ती करण्यात आल्यास त्याची लेखी तक्रार कृषी विभागाकडे करण्याच्या सूचना सुद्धा कृषी केंद्र संचालकांना करण्यात आल्या आहे. भरारी पथके अनेक कारवाई शून्य- दरवर्षी खरीप हंगामाच्या काळात खते, बियाणे यांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथके गठित केली जातात. मात्र शेतकऱ्यांची लूट आणि दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी पुढे येऊनदेखील विक्रेत्यांवर कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. भरारी पथके अनेक कारवाई मात्र शून्य अशीच परिस्थिती जिल्ह्यात आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी