शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
7
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
8
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
9
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
10
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
11
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
12
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

भजेपार चषक खेळाडू निर्मितीची फॅक्टरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 12:22 AM

सालेकसा तालुक्यातील भजेपारसारख्या गावात स्वदेशी खेळ कबड्डी खेळाला अतिशय प्रभावीपणे सादर करण्यासाठी भजेपारवासीयांचे कौतुक करावस वाटते. कबड्डी हा मैदानी खेळ असून आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डीचे महत्व वाढत आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : सालेकसा तालुक्यातील भजेपारसारख्या गावात स्वदेशी खेळ कबड्डी खेळाला अतिशय प्रभावीपणे सादर करण्यासाठी भजेपारवासीयांचे कौतुक करावस वाटते. कबड्डी हा मैदानी खेळ असून आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डीचे महत्व वाढत आहे. भजेपार वासीयांनी व्यापक स्वरुपात खेळाचे आयोजन केल्याने ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे एक प्रकारे भजेपारला कबड्डी खेळाडूंची फॅक्टरी म्हटल्यास वावगे ठरू नये, असे विचार अखिल भारतीय काँग्रेस खेत मजूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खा. नाना पटोले यांनी व्यक्त केले.सूर्योदय क्रीडा मंडळ,नवयुवक कबड्डी क्लब व ग्रामपंचायत भजेपार यांच्या संयुक्त विद्यमाने भजेपार येथे आंतरराष्ट्रीयय महिला व पुरुष कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (दि.४) करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. सहउद्घाटक माजी आ. रामरतन राऊत, दीप प्रज्वलक महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, भाजपा सालेकसा तालुकाध्यक्ष परसराम फुंडे, सरपंच सखाराम राऊत, कारूटोलाचे उपसरपंच नंदकिशोर चुटे, उपसरपंच कैलास बहेकार, सिने कलावंत गणेश देशमुख, ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते. सर्वप्रथम बजरंग बली, संत गाडगेबाबा, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राचे पूजन करण्यात आले. सर्व प्रथम गणपती वंदना करण्यात आली. स्पर्धेदरम्यान विष्णू पाथोडे यांचा सत्कार करण्यात आला. पटोले म्हणाले, ग्रामीण भागात अनेक चांगले खेळाडू असून त्यांना पुढे येण्यासाठी योग्य मंच आणि मार्गदर्शनाची गरज आहे. भजेपार चषकाच्या आयोजनामुळे खऱ्या अर्थाने हे काम शक्य होत असल्याचे सांगितले. पुराम यांनी सद्यस्थितीत शासनातर्फे शेतकºयांच्या हितासाठी ज़्या योजना राबविल्या जात आहेत त्यासंबंधी माहिती दिली. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन रमसुला चुटे तर प्रास्ताविक चंद्रकुमार बहेकार यांनी केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेKabaddiकबड्डी