शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बहेकार यांना राज्यस्तरीय जैवविविधता पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 21:45 IST

अंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रा जैवविविधता मंडळातर्फे सावन बहेकार यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश भारती डोंगरे व नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या हस्ते नागपूर येथे सन्मानीत करण्यात आले.

ठळक मुद्देअंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळातर्फे सम्मान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रा जैवविविधता मंडळातर्फे सावन बहेकार यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश भारती डोंगरे व नागपूरचे विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या हस्ते नागपूर येथे सन्मानीत करण्यात आले.बहेकार गेल्या १८ वर्षापासून वन्यजीव व पर्यावरन संरक्षणासाठी गोंदिया जिल्ह्यात तसेच लगतच्या बालाघाट, भंडारा येथे काम करीत आहेत. ते उच्चशिक्षीत असून ते या सामाजिक क्षेत्रात सतत आपली सेवा देत आहेत. गेल्या दशकापासून सारस पक्षी संवर्धन-संरक्षणाकरिता लोकसहभागातून उल्लेखनीय कार्य करीत आहेत. अतिसंरक्षीत सारस पक्षी हा संपूर्ण महाराष्ट्रात फक्त गोंदिया जिल्ह्यातच अस्तित्वात आहे हे सावन व त्यांच्यासोबती कार्यकर्त्यांमुळेच संभव झालेले आहे.काळवीट संरक्षण असो की लांडग्यावर सनियंत्रण (मॉनिटरींग) उपलब्ध जैवविविधता संसाधनांचे संरक्षण व त्याचे पुनरुज्जीकरण (रिस्टोरेशन), व्याघ्र संरक्षण असो की वाघांच्या हालचालींवर संनियंत्रण ठेवून वाघांच्या भ्रमणमार्गाचा अभ्यास करणे, अवैध शिकारीवर आळा घालण्याकरिता वन विभागासोबत सतत कार्य करणे हे सर्व कार्य बहेकार पुढाकार घेऊन करीत आहेत.जिल्ह्यात अनेक तलाव असून तलावांच्या संरक्षणासाठी व त्यातील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी व जैवविविधतेचे पुनरुज्जीकरणाकरिता ते महत्वाची भूमिका पार पाडत आहे. पर्यावरण व वन्यजीव संरक्षणाकरिता क्षेत्रामध्ये कार्य करीत असलेल्या सेवा संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून कार्य करीत आहे. याआधी त्यांना त्यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्र युथ आयकॉन २०१४ व महाराष्ट्र वाईल्डलाईफ अवार्ड २०१५ असे सेंच्युरी एशिया अवार्ड मिळाले आहेत. शिवाय मानद वन्यजीव रक्षक म्हणून २०१२-२०१७ पर्यंत उल्लेखनीय कार्य केले आहे.तसेच जिल्हा पर्यटन समिती, जिल्हा व्याघ्रकक्ष समिती, जिल्हा जैवविविधता समितीतही सदस्य म्हणून ते कार्य करीत आहेत. बहेकार यांच्या सम्मानाबद्दल भरत जसानी, मुनेश गौतम, अविजीत परिहार, गौरव तुरकर, अंकीत ठाकुर, शशांक लाडेकर, दुष्यंत रेभे, अपूर्व मेठी, विप्लोव जायस्वाल, दुष्यंत आकरे, निलेश कोठारी, विकास फरकुंडे यांनी त्यांचे कौतूक केले आहे.

टॅग्स :Bio Diversity dayजैव विविधता दिवस